महिला शेतकरी प्रमाणपत्र 2026:महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी अत्यंत महपूर्ण योजना या तयार केलेली आहे. या योजनेद्वारे महाराष्ट्रातील महिलांना महिला शेतकरी प्रमाणपत्र मिळणार आहे. हे प्रमाणपत्र अत्यंत महत्त्वाचे असून हे प्रमाणपत्र सरकारच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणार आहे. त्यामध्ये पीक विमा योजना असेल, अनुदानाच्या योजना असतील, कर्ज सुविधा असतील या सर्वांसाठी आता महिला शेतकरी प्रमाणपत्र महिलांकडे असणं गरजेच आहे. त्याचप्रमाणे तुम्ही महिला बचत गट सदस्य असतात तरीसुद्धा तुम्हाला हे प्रमाणपत्र आवश्यक आहे. तर आजच्या लेखांमधून आपण हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज कशा प्रकारे करायचा? यासाठी पात्रता काय आहेत?कागदपत्रे काय काय लागतील? याची संपूर्ण माहिती या लेखामध्ये बघणार आहोत तरी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा.
हे देखील वाचा
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! घरबसल्या ई-पीक पाहणी करा, जाणून घ्या सोपी पद्धत DCS MH e-peek pahani
महिला शेतकरी योजना पात्रता
तुम्ही महिला शेतकरी असाल आणि या योजनेसाठी अर्ज करणार असेल तर याच्या पात्रता खालील प्रमाणे आहेत.
- अर्जदार महिला असावी.
- ती महिला जमीन मालक असावी. वाटेकरी,भाडेकरू, शेतमजूर त्याच बरोबर बटाईदार म्हणून शेतीमध्ये काम करणारे असावी.
- मग त्या महिलेकडे शेती असो किंवा नसो.
- ती महिला महाराष्ट्राचे रहिवासी असावी.
- फलो उत्पादन , पशुपालन , मस्त व्यवसाय इत्यादी प्रकारची कामे यासाठी 18 वर्ष वय पूर्ण असणं गरजेच आहे.
- त्या महिलेकडे वैद्य पुरावा म्हणून आधार कार्ड असावे.
कारण आधार कार्ड ला लिंक असलेला मोबाईल नंबर आणि बँक खाते याद्वारे या योजनेचा लाभ ऑनलाइन पद्धतीने बँकेत जमा केला जाणार आहे.
आवश्यक कागदपत्रे
महिला शेतकरी प्रमाणपत्र साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे:
- रेशन कार्ड
- मतदान कार्ड
- लाईट बिल
यापैकी कोणतेही एक कागदपत्रे चालेल.
या योजनेसाठी अर्ज कोण करू शकते?
शेती करणारी कोणती महिला यासाठी अर्ज करू शकते यासाठी ग्रामसभेची पडताळणी होणार आहे जी पुढील ग्रामसभेमध्ये किंवा नगरपंचायतीच्या बैठकीमध्ये त्या महिलेच्या अर्जावरती विचार केला जाणार आहे. त्यानंतर ठराव मंजूर होऊन तुम्हाला प्रमाणपत्र मिळेल. हे प्रमाणपत्र ठराव मंजूर झाल्यानंतर तुम्हाला पंधरा दिवसांमध्ये प्रमाणपत्र दिले जाणार आहे. जर अर्ज नाकारला तरी सुद्धा तुम्ही यासाठी अपील करू शकता.
हे प्रमाणपत्र कशासाठी महत्वपूर्ण आहे
पिक कर्ज,बचत गट, कौशल्य प्रशिक्षण, आधुनिक वर्ष तंत्र मार्गदर्शन, बाजारपेठ साठवणूक वाहतूक पिक विमा अनुदान योजना, बियाणे खते शेती साहित्य योजना, विधवा घटस्फोटीत एकल महिला शेतकऱ्यांसाठी सुद्धा हे प्रमाणपत्र अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. याबाबतची माहिती तुम्ही पोर्टलवर सुद्धा बघू शकता.
ऑनलाइन अर्ज कसा करायचा?
ऑनलाइन अर्ज कशाप्रकारे करायचे याची स्टेप बाय स्टेप माहिती आपण आज पाहणार आहोत ती माहिती खालील प्रमाणे आहे.

- सर्वप्रथम आपल्याला अधिकृत वेबसाईट वरती घ्यायचा आहे.
- इथे आल्यानंतर अप्लाय नाऊ या बटना वरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर महिला शेतकरी साठी अर्ज करा.
- त्यानंतर महिला शेतकरी साठी अर्ज करा असा फॉर्म जो आहे तो तुम्हाला ओपन होईल.
- आता आधार कार्ड वरती जे तुमचे नाव आहे ते नाव टाकायचे आहे. हे नाव तुम्हाला इंग्लिश मध्ये टाकायचे आहे.
- त्यानंतर आधार कार्ड बारा अंकी नंबर टाकायचा आहे.
- त्यानंतर तुमचा जिल्हा तालुका आणि गाव सिलेक्ट करायचे आहे.
- आता ओटीपी पाठवा वरती क्लिक करा. तुमच्या आधार कार्ड ला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती सहा अंकी ओटीपी येईल ओटीपी टाकून सबमिट बटनावरती क्लिक करा.
- आता ओटीपी व्हेरिफाय वरती क्लिक करा तो तुमचा फोटो नाव जन्मतारीख ऍड्रेस सगळी माहिती ऑटोमॅटिकली येणार आहे. तुम्ही दिलेला पत्ता तोच आहे का आणि तो कायमचा आहे की तात्पुरता त्यावरती होय किंवा नाही बटणावरती क्लिक करून घ्या.
- आता तुमचा मोबाईल नंबर टाका त्यानंतर तुमची कास्ट कॅटेगिरी निवडा.
- आता अर्जाशी संबंधित महिला शेतामध्ये कोणत्या प्रकारचे काम करते ते प्रकार निवडा वरून क्लिक करून घ्या. त्यानंतर खाली तुम्हाला टाईप ऑफ ग्रीकल्चर वर्क मध्ये शेतीतले कोणते काम त्या कामाचा प्रकार निवडून घ्यायचा आहे.
- स्थलांतित स्वरूपात मध्ये शेती शेत मजूर असेल तरी सुद्धा शेवटचं ऑप्शन आहे.
Farmer ID ची माहिती

अशाप्रकारे माहिती भरल्यानंतर तुम्हाला आता तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याकडे फार्मर आयडी आहे का? जर फार्मर आयडी असेल तर तो 11 अंकी टाकून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा फार्मर आयडी हा वैकल्पिक आहे जर तुमच्याकडे फार्मर आयडी असेल किंवा नसेल तरीसुद्धा तुम्ही शेतकरी दर्जा महिलांना देण्यात येणार आहे.
- जर तुमच्याकडे फार्मर आयडी नसेल तर तुम्ही नाही या ऑप्शन वरती क्लिक करा.
- आता सबमिट करा या बटनावरती क्लिक करा.अशाप्रकारे तुमचा अर्ज व्यवस्थित रित्या सादर झालेला आहे.
- आता तुम्हाला एक कनॉलेजमेंट नंबर आला असेल तो नंबर सेव्ह करून ठेवा नंतर भविष्यामध्ये तुम्हाला सर्टिफिकेट डाऊनलोड करण्यासाठी तो लागणार आहे.
अशाप्रकारे तुम्हाला अर्ज सादर केल्यानंतर तुम्हाला ट्रॅक एप्लीकेशन स्टेटस इथे जाऊन आपला कनॉलेजमेंट किंवा तुमच्या नावानुसार आपलं जे स्टेटस आहे ते अर्जातच तुम्ही पाहू शकता.
प्रमाणपत्र मिळण्यासाठी लागणारा कालावधी
हे प्रमाणपत्र मिळण्यासाठी तुम्हाला 15 ते 30 दिवसाचा कालावधी लागू शकतो. तुमचा अर्ज मंजूर झाला तर तुम्हाला डाऊनलोड सर्टिफिकेट चा एक पर्याय दिसेल त्यावर तुम्ही कनॉलेजमेंट नंबर किंवा आधार कार्ड नंबर टाकून तुमचा शेतकरी महिला प्रमाणपत्र ते डाऊनलोड सुद्धा करू शकता.
अशाप्रकारे आपण महिला शेतकरी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत काय पात्रता आहे आणि अर्ज कशा प्रकारे करायचा आहे त्याची संपूर्ण माहिती बघितलेली आहे. भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन लेखात महत्त्वपूर्ण योजनेसह धन्यवाद.
निष्कर्ष
महिला शेतकऱ्यांना विविध शासकीय योजना आणि कृषी सुविधांचा लाभ घेण्यासाठी अधिकृत नोंदणी महत्त्वाची ठरू शकते. त्यामुळे महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्यापूर्वी पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया व्यवस्थित समजून घेणे आवश्यक आहे.
अर्ज करताना सर्व माहिती अचूक भरा आणि अर्ज सबमिट केल्यानंतर मिळालेला Acknowledgement Number सुरक्षित ठेवा. तसेच नियम आणि प्रक्रियेत बदल होऊ शकत असल्याने अर्ज करण्यापूर्वी संबंधित अधिकृत पोर्टलवरील ताजी माहिती तपासणे योग्य राहील.
| महाराष्ट्र महिला शेतकरी जीआर 2026 | PDF link |
| महिला शेतकरी पोर्टल | महिला शेतकरी पोर्टल |
महिला शेतकरी प्रमाणपत्र याबाबत विचारलेले प्रश्न
महिला शेतकरी प्रमाणपत्र म्हणजे काय?
महिला शेतीशी संबंधित काम करत असल्याचे अधिकृतपणे दर्शवणारे हे प्रमाणपत्र असून, विविध शासकीय कृषी योजना आणि सुविधांसाठी त्याचा उपयोग होऊ शकतो.
महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी कोण अर्ज करू शकते?
महाराष्ट्रातील 18 वर्षे पूर्ण झालेली महिला, जी शेती, शेतमजुरी, वाटेकरी, भाडेकरू किंवा इतर कृषी संबंधित काम करते, ती पात्रतेनुसार अर्ज करू शकते.
महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी आधार कार्ड आवश्यक आहे का?
होय. ऑनलाइन अर्ज प्रक्रियेत आधार कार्डचा वापर आणि OTP पडताळणी केली जाऊ शकते.
महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी कोणती कागदपत्रे लागतात?
आधार कार्डसोबत रेशन कार्ड, मतदान कार्ड किंवा लाईट बिल यापैकी उपलब्ध असलेला रहिवासाचा पुरावा आवश्यक असू शकतो.
Farmer ID नसल्यास महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी अर्ज करता येतो का?
दिलेल्या प्रक्रियेनुसार Farmer ID उपलब्ध नसल्यास त्यासाठी ‘नाही’ हा पर्याय निवडून अर्ज करता येऊ शकतो.
महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी ग्रामसभेची मंजुरी लागते का?
अर्जाची स्थानिक पातळीवर पडताळणी होऊन ग्रामसभा किंवा संबंधित स्थानिक संस्थेच्या बैठकीत त्यावर विचार केला जाऊ शकतो.
अर्जाचा स्टेटस कसा तपासायचा?
ऑनलाइन पोर्टलवरील Track Application Status पर्यायातून Acknowledgement Number किंवा उपलब्ध इतर माहितीच्या आधारे अर्जाचा स्टेटस तपासता येतो.
महिला शेतकरी प्रमाणपत्राचा उपयोग कशासाठी होतो?
पीक विमा, कृषी अनुदान, कर्ज सुविधा, बचत गट, कौशल्य प्रशिक्षण, बियाणे, खते आणि शेती साहित्याशी संबंधित योजनांमध्ये हे प्रमाणपत्र उपयोगी ठरू शकते.
मित्रांनो,
माझे नाव मंगेश आहे. मला सरकारी योजना,शेतकरी योजना,लाडकी बहीण योजना या संबंधित अन्य शासनाच्या योजनांची माहिती देण्याचा पाच वर्षाचा अनुभव आहे. मी शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरून माहिती गोळा करून लेख तयार करतो. त्यामध्ये अधिकृत शासनाची वेबसाईट ची लिंक फॉर्म कसा भरायचा यासंबंधीत संपूर्ण माहिती दिलेली असते त्यामुळे नागरिकांना सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी मदत होते. धन्यवाद