Yojanamarathi.com वर आपले सहर्ष स्वागत आहे!
Yojanamarathi.com हे महाराष्ट्रातील नागरिक, शेतकरी, तरुण आणि महिलांसाठी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची अचूक आणि सोप्या भाषेतील माहिती सर्वसामान्य पर्यंत पोहोचवण्यासाठी तयार केलेली एक वेबसाईट मंच आहे.
महाराष्ट्र शासन तसेच केंद्र शासन विविध प्रकारचे योजना सतत लोककल्याणासाठी तयार करत असतात.याची माहिती महाराष्ट्रातील लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने तसेच त्यांना लवकर आणि सरळ सोप्या भाषेत योजनेची संपूर्ण माहिती मिळावी जेणेकरून ते शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकेल या उद्देशाने आम्ही योजना मराठी ही वेबसाईट तयार केली आहे.
आमचा उद्देश
शासनाच्या नवीन जीआर (GR),योजना संदर्भातील अधिकृत माहिती सर्वात आधी लोकांपर्यंत पोहोचविणे. ती माहिती सरळ सोप्या भाषेत नागरिकांना समजेल अशा प्रकारे मराठी भाषेत पुरविणे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारे कागदपत्रे,पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत त्याचबरोबर फॉर्म कसा भरायचा? तसेच योजनेचा लाभ कशाप्रकारे मिळवायचा?याची स्पष्टपणे आणि अचूक पद्धतशीर माहिती पुरविणे. हाच आमचा मुख्य उद्देश आहे.
आम्ही या विषयावरती योजनांची माहिती देतो
शेतकरी योजना त्यामध्ये पीएम किसान, नमो शेतकरी महासन्मान निधी, पीक विमा, शेती अवजारे अनुदान इत्यादी.
महिला व बालकल्याण योजना यामध्ये लाडकी बहीण योजना, लेक लाडकी योजना आणि इतर महिला संबंधित योजना
विद्यार्थी व शिक्षण: शिष्यवृत्ती (Scholarships), मोफत लॅपटॉप/टॅबलेट योजना, शैक्षणिक कर्ज सहाय्य.
स्वयंरोजगार कर्ज योजना (PMEGP, मुद्रा लोन)
पेन्शन योजना, रेशन कार्ड, आयुष्मान भारत व आरोग्य योजना. अशाप्रकारे आम्ही योजनांची माहिती देऊ.
आमच्याबद्दल थोडक्यात
मी गेल्या पाच वर्षापासून योजना संबंधित माहिती गोळा करून वेबसाईट वरती अपलोड करीत आहे ती माहिती अधिकृत वेबसाईटवरून घेऊन योग्य लेख तयार करून त्यामध्ये फॉर्म त्याचबरोबर सरकारच्या योजना ची अधिकृत वेबसाईट ची लिंक याची खात्रीशीर माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहे.त्यामुळे याचा नागरिकांना नक्कीच फायदा होईल याची मला खात्री आहे.
अस्वीकरण
Yojanamarathi.com ही कोणतीही सरकारची वेबसाईट नसून ती लोकांना सरकारी योजनांची माहिती पुरवण्यासाठी तयार केलेली एक व्यक्तिगत साईट आहे आम्ही फक्त अधिकृत वेबसाईटवरून तसेच विविध स्रोतांचा तपशील घेऊन त्या माहितीच्या आधारे एक लेखाद्वारे नागरिकांना माहिती पुरवण्याचे काम करीत आहे तरी योजनेचा लाभ घेण्यापूर्वी शासनाच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन अधिकृत माहितीची नागरिकांनी नोंद घ्यावी.
आमच्याशी संपर्क साधा
जर आपल्याला आमच्या लेखा विषयी काही तक्रार किंवा माहिती पाहिजे असल्यास आपण थेट आमच्याशी संपर्क साधू शकता:
- ईमेल: bhongalmangesh4@gmail.com
- वेबसाइट: https://yojanamarathi.com
- पत्ता/स्थान: महाराष्ट्र, भारत