DCS MH e-peek pahani : शेतकरी बांधवांनो तुम्हाला आता पीक पाहणी करण्यासाठी पीक पाहणी सहायकाची गरज असणार नाही. तुम्ही आता स्वतः तुमच्या मोबाईल मधून सुद्धा पीक पाहणी करू शकणार आहे आणि ही ई पीक पाहणी आपल्या मोबाईलच्या माध्यमातून कशी करायची? ॲप इन्स्टॉल करण्यापासून ते पीक पाहणी पूर्ण होईपर्यंत ए टू झेड प्रोसेस तुम्हाला या लेखांमधून दिलेली आहे.तरी हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचावा.
DCS MH e-peek pahani कशी करायची?
तर सर्वप्रथम तुम्हाला आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोर ओपन करायचे आहे आणि यामध्ये आपल्याला डीसीएस एमएच असे सर्च करून जे काही अप्लिकेशन येणार आहे.ते अप्लिकेशन आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचे आहे.

- या ठिकाणी आपल्याला ते ओपन करायचे आहे. जसे तुम्ही हे अप्लिकेशन ओपन करणार आहात. यामध्ये तुम्हाला काही परमिशन विचारले जाईल. यामध्ये आपल्याला व्हाईल युजिंग द ॲप यावरती आपल्याला अशी परमिशन द्यायची आहे.
- त्यानंतर सिलेक्ट भाषा मध्ये तुम्हाला भरपूर अशा भाषा विचारल्या जातील ज्यामध्ये इंग्लिश,हिंदी,मराठी आणि इतर काही बऱ्याच भाषा असणार आहे.तर यामध्ये आपण मराठी भाषा वरती क्लिक करून खाली आपल्याला नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर या ठिकाणी पहा आपल्याला दोन ऑप्शन देण्यात आलेले आहेत. सर्वेक्षक व्हा.आणि तुमच्या खात्यात साईन इन करा. तर आपल्याला तुमच्या खात्यात साईन इन करा या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे.
- जसे तुम्ही यावरती क्लिक कराल यामध्ये पहा तुम्हाला चार ऑप्शन देण्यात आलेले आहे. यापैकी तुम्हाला चार नंबरचा ऑप्शन आहे शेतकरी म्हणून साईन इन करा या ऑप्शन वरती आपल्याला क्लिक करायचे आहे.

- त्यानंतर साईन इन करण्यासाठी तुम्हाला सेंट्रल आयडी जो काही तुमचा फार्मर आयडी आहे तो फार्मर आयडी टाकून तुम्हाला तुमचा माहित असलेला पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आणि तुम्हाला पासवर्ड माहित नसेल तर सांकेताक या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे आणि यामध्ये तुमचा फार्मर आयडी टाकून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर खाली आपल्याला गेट ओटीपी या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वरती एक सहा अंकी ओटीपी येणार आहे तो ओटीपी आपल्याला या संकेतांक मध्ये टाकून घ्यायचा आहे त्यानंतर खाली आपल्याला व्हेरिफाय या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर यामध्ये तुम्हाला काही स्टेप दाखवल्या जाणार आहे या 20 स्टेप आपल्याला यामध्ये पूर्ण होऊ द्यायचे आहे.
- या ठिकाणी पहा युज एम पिन तुम्हाला ॲप्लिकेशन ओपन करताना एम पिन वापरायचा की युज फिंगरप्रिंट किंवा फेस ऑथेंटिकेशन आपल्याला अप्लिकेशन ओपन करण्यासाठी युज फिंगरप्रिंट व्हॅलिडेट या ऑप्शन वरती आपल्याला क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर आपल्याला यामध्ये ऑफिशियल नोटीस दाखवणार आहे. आपल्याला या बॉक्स वरती क्लिक करून प्रोसड या बटनावरती क्लिक करायचे आहे. या ठिकाणी पहा आपल्याला नवीन सूचनां मध्ये सर्वे पेंडिंग आपला एक दाखवणार आहे.आणि पीक सर्वेक्षण करा या ऑप्शन वरती आपल्याला क्लिक करायचे आहे.
- जसे तुम्ही पीक सर्वेक्षण करा या ऑप्शन वरती क्लिक कराल या ठिकाणी पहा सर्वेक्षण प्रलंबित या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे. या ठिकाणी पहा तुमच्या गावाचे नाव सर्वे क्रमांक शेतकऱ्याचे नाव या ठिकाणी संपूर्ण माहिती दाखवणार आहे या ठिकाणी आपल्याला सर्वेक्षण सुरू करा या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे.
- जसे तुम्ही यावरती क्लिक कराल यामध्ये पीक सर्वेक्षण करा मध्ये वर्ष दाखवणार आहे 2026-2027 हंगाम हा खरीब दाखवणार आहे त्यानंतर खाली तुम्हाला तुमचे लोकेशन दाखवणार आहे तुम्हाला तुमच्या अक्युरेट लोकेशन म्हणजे 20 मीटर च्या आतमध्ये तुम्हाला उभे राहायचे आणि या ठिकाणी आपल्याला पुढे जा या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे.

- परत आपल्याला या ठिकाणी पुढे जा वरती क्लिक करायचे आहे यामध्ये जमिनीचा वापर बिगर शेती कारणांसाठी केला आहे का? तुम्ही जर का तुमच्या जमिनीचा वापर बिगर शेतीसाठी म्हणजे पळीत असेल किंवा इतर त्यामध्ये काही शेळीपालन वगैरे असेल यासाठी केला असेल तर होय करायचे आहे आणि जर केले नसेल तर आपण नाही या ऑप्शन वरती क्लिक करून पुढे या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर पळीक नापीक की मोकळी जमीन तुमची पडीक क्षेत्र आहे का? असेल तर होय करायचे आहे आणि नसेल तर आपल्याला नाही या ऑप्शन वरती क्लिक करून पुढे या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर या ठिकाणी पहा यामध्ये ऑलरेडी हार्वेस्टर म्हणजे तुमच्या शेतातील पीक हार्वेस्ट केलेले आहे का? म्हणजे कापलेले आहे का? कापलेले असेल तर होय करायचे आहे पिकाचे नाव आणि क्षेत्रफळ निवडायचे आहे आणि फोटो अपलोड करायचे आहे नसेल तर नाही वरती क्लिक करून आपल्याला पुढे या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर पहा तुमच्यासमोर परत एक नवीन पेज ओपन होणार आहे यामध्ये पहा तुम्हाला तीन ऑप्शन दाखवण्यात आलेले आहे त्यामध्ये पॅरेनियल्स बेनीयल्स आणि सिजनल तर आपल्याला या सिजनल जो काही तीन नंबरचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर इज द एनी सिजनल क्रॉप यावरती आपल्याला होय या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर ऍड क्रॉप सिजनल साठी आपल्याला हा ग्रीन कलरचा ऑप्शन शो होणार आहे या ग्रीन क्रॉप सीजनल वरती आपल्याला प्लस च ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे.यामध्ये ऍड क्रॉप सीजनल मध्ये पिकाचे नाव विचारेल.
- सर्वप्रथम तुमच्या शेतामध्ये सध्या कोणते पीक आहे सोयाबीन असेल तर आपल्याला या ठिकाणी सोयाबीन सिलेक्ट करून घ्यायचे आहे.

- त्यानंतर पिकाचा वान विचारेल पिकाचा वाण कोणता आहे ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर पेरणीची तारीख विचारलेली आहे पेरणी तुमची कोणत्या महिन्यामध्ये झालेली होती त्याची तारीख यामध्ये आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचे आहे आपली तारीख टाकून झाल्यावर ठीक आहे वरती क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर क्रॉप पॅटर्न विचारेल क्रॉप पॅटर्नमध्ये यामध्ये सिंगल आहे इंटर आहे का मिक्स आहे यामध्ये मिक्स मध्ये तुमचे जर का काही सोयाबीन सोबत अजून दुसरे कोणते पीक पेरलेले असेल तर ते टाकू शकता आणि इंटर मध्ये अर्धी सोयाबीन आणि अर्धे क्षेत्रामध्ये दुसरे इतर पीक असेल तर इंटर मध्ये सिलेक्ट करू शकता आणि फक्त सोयाबीन असेल तर सिंगल वरती आपल्याला क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर या ठिकाणी तुमचे एकूण बॅलन्स एरिया अवेलेबल म्हणजे तुमचे एकूण क्षेत्र दाखवणार आहे तर 0.85 85 आर तुमच्या यामध्ये असणार आहे एकूण क्षेत्र यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहे क्षेत्र टाकून झाल्यानंतर खाली असलेले क्षेत्र यामध्ये शून्य दाखवणार आहे.
- त्यानंतर सिंचनाचा प्रकार विचारलेला आहे सिंचनाचा प्रकार यामध्ये सिंचित असेल तर काय सिंचित मध्ये काय असणार आहे तुमच्याकडे विहीर असेल तलाव असेल बंधारा असेल जे असेल ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचे आहे आणि यामध्ये गैरसिंचित जर का असेल म्हणजे कोरडवाहू असेल तर गैरसिंचित वरती आपल्याला क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर या ठिकाणी तीन वेगवेगळ्या ठिकाणचे फोटो यामध्ये सिलेक्ट करून घ्यायचे आहे तर या ठिकाणी पहा आपण तीन वेगवेगळ्या ठिकाणचे फोटो फोटो अपलोड केलेले आहे यामध्ये फोटो काढल्यानंतर खाली आपल्याला पीक जोडा या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे.यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहा तुमचे पिकाची माहिती यामध्ये तुम्हाला दाखवणार आहे तुमचे क्षेत्रफळ दाखवणार आहे आपल्याला पुढे या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे.
- यावरती क्लिक केल्यानंतर यामध्ये परत तुम्हाला तुमच्या पिकाचे तुमच्या शेतकऱ्याचे नाव दाखवणार आहे या बॉक्स वरती क्लिक करायचे आहे मी मिडिया फाइल्स आणि इतर डेटा सत्यापित केला आहे.या बॉक्स वरती क्लिक केल्यानंतर खाली आपल्याला जतन करा.या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे.
- तर या ठिकाणी पहा आपल्या पिकाची माहिती अपलोड झालेली आहे तर यामध्ये सर्वेक्षण प्रलंबित मध्ये शून्य दाखवणार आहे.आणि अपलोड केले मध्ये एक दाखवणार आहे.
तर या ठिकाणी पहा आपली पीक पाहणी झालेली आहे पहा वरती क्लिक करून त्यामध्ये तुमचा गट क्रमांक असेल तुमचा जिल्हा असेल तालुका असेल तुमचे गाव तुमचे क्षेत्रफळ सर्व माहिती या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे तर अशाप्रकारे आपल्या शेतामध्ये जाऊन आपल्या पिकाची पीक पाहणी ही करून घ्यायची आहे.
अधिक माहितीसाठी yojanamarathi भेट द्या.