अभिनेत्री यामी गौतमची (Yami Gautam) प्रमुख भूमिका असलेला  'आर्टिकल 370' चित्रपटाला (Article 370 Movie) बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळत आहे.

चित्रपटात जम्मू-काश्मीर राज्याला विशेष राज्याचा दर्जा देणाऱ्या संविधानातील अनुच्छेद 370  आणि दहशतवादी कारवायांबाबत भाष्य करण्यात आले 

या चित्रपटात यामी बरोबरच अभिनेत्री प्रियमनी ने आपल्या भूमिकेने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे.

मराठी अभिनेता वैभव तत्ववादी ही आपल्या सहज अशा भूमिकेने  मनाला भुरळ घालून जातो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू येथील एका सभेत यामी गौतमच्या आर्टिकल 370 चित्रपटाचा उल्लेख केला होता. पंतप्रधान मोदी यांनी म्हटले होते की, आर्टिकल 370 वर कोणता तरी चित्रपट येणार आहे, असे समजले. या निमित्ताने आता लोकांना सत्य माहित समजेल असेही त्यांनी म्हटले होते 

Article 370 चित्रपटात असलेले ते कलम ३७० भारतीय एकात्मतेला किती हानिकारक होते आणि मोदी सरकारने ते रद्द करून नेमकं काय साहस केलाय ते वाचा एकदम सोप्या शब्दात..