Voter ID Online Apply अर्ज करा ecinet मोबाइल ॲपवरून घरबसल्या तेही 2 मिनिटात

Voter ID Online Apply : जर तुम्हाला नवीन मतदान कार्ड काढायचे असेल किंवा मतदार यादी मध्ये आपले नाव नोंदवायचे असेल तरीही प्रक्रिया तुम्ही घरबसल्या मोबाईलवरून सहजपणे करू शकता यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही मतदान कार्ड साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा मतदार यादी मध्ये नाव कसे नोंदवायचे आणि सध्या या नवीन प्रक्रियेमध्ये कोणकोणते बदल झालेले आहेत याची संपूर्ण डिटेल माहिती या लेखातून आपण आज बघणार आहोत जर तुमचे मतदानाचे वय झाले असेल किंवा अजून तुमचे मतदार यादी मध्ये नाव नसेल तर ही माहिती शेवटपर्यंत वाचा.

Voter ID Online Apply नवीन मतदार नोंदणी फॉर्म कसा भरावा

नवीन मतदार नोंदणी अर्ज online

  • सर्वप्रथम play store वर जाऊन ECI NET हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्या.हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर ते ओपन करून आवश्यक असलेल्या परमिशन Allow करून घ्या.
  • एप्लीकेशन ओपन केल्यानंतर Voter Registration Forms हा पहिला दिसेल त्यावरती क्लिक करून New Voter Registration या ऑप्शनवर क्लिक करा.

नवीन मतदार अकाउंट नोंदणी

  • New Voter Registration वरती क्लिक केल्यानंतर तुमचे अकाउंट आहे का अशी माहिती विचारली जाईल अकाउंट असल्यास मोबाईल नंबर टाकून Send OTP हा पर्याय दाबा आणि आलेला ओटीपी टाकून लॉगिन करून घ्या आणि अकाउंट नसेल तर New User या ऑप्शन वरती क्लिक करा.
  • त्यानंतर मोबाईल नंबर टाकून सेंड ओटीपी वर क्लिक करा आणि आलेला ओटीपी टाकून First Name आणि Last Name टाकून सबमिट बटनावर क्लिक करा.

अशा प्रकारे तुम्हाला User Created Successfully असा मेसेज येईल आणि तुमचे नवीन खाते तयार होईल.

हे पण वाचा

प्रधानमंत्री आवास योजना 2.0: 1 कोटी घरांसाठी Online अर्ज सुरू, पात्रता व कागदपत्रांची संपूर्ण माहिती

मतदार अकाऊंट लॉगिन

  • तुमचे अकाउंट तयार झाल्यानंतर तुम्हाला परत लॉगिन करावे लागेल तुमचा मोबाईल नंबर आणि ओटीपी टाकून लॉगिन करून घ्या.
  • त्यानंतर पुन्हा Voter Registration Forms या पर्यायावर जाऊन New Voter Registration वर क्लिक करा.
  • त्यानंतर Form Number 6 New Voter Registration हा पर्याय निवडा.
  • आता तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल त्यालाच कॉल करून खाली आल्यानंतर Lets Start हे बटन तुम्हाला दिसेल त्यावरती क्लिक करा आणि Are You Applying For The Voter ID असा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल.
  • जर तुम्ही पहिल्यांदाच मतदान कार्ड यासाठी अर्ज करीत असाल तर एस हा पर्याय निवडा आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक करा.
  • आता तुमचे राज्य जिल्हा आणि मतदार संघ याची माहिती भरून घ्या.
  • त्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्र राज्य त्यानंतर तुमचा जिल्हा आणि ज्या मतदारसंघांमध्ये नाव लावायचे आहे तो मतदार संघ निवडून घ्या.

नवीन मतदार नोंदणी पुराव्यासाठी कागदपत्रे

  • आता तुमची जन्मतारीख विचारली जाईल ती Day, Month आणि Year याप्रमाणे निवडून घ्या.
  • जन्मतारखेच्या पुराव्यासाठी Birth Certificate, PAN Card, Driving Licence, दहावीची Marksheet, Passport किंवा Aadhaar Card यापैकी कोणतेही एक कागदपत्र निवडून घ्या.
  • जन्मतारखेचा जो पुरावा तुम्ही निवडलेला आहे तो अपलोड करून घ्या यासाठी Self Attested Copy म्हणजेच या डॉक्युमेंट ची झेरॉक्स काढून त्यावरती सही करून ते अपलोड करून घ्या हे डॉक्युमेंट दोन एमबी पर्यंत अपलोड करता येते ते अपलोड झाल्यानंतर नेक्स्ट बटनावरती क्लिक करा.

मतदार नोंदणीसाठी वैयक्तिक माहिती भरणे

त्यानंतर तुम्हाला Upload Picture हा पर्याय येईल तेथे पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे हा फोटो 200kb पर्यंत असावा. त्यानंतर तुमचे लिंग निवडून घ्या.Voter ID download with photo

आता तुमचे नाव भरून घ्या आणि नाव भरताना पहिले नाव या बॉक्समध्ये पूर्ण नाव इंग्लिश मध्ये आणि खाली मराठीमध्ये पूर्ण नाव भरात नावामध्ये नाव मधले नाव आणि आडनाव अशा पद्धतीने पूर्ण नाव भरून घ्यायचे आहे जे तुमचे आधार कार्ड वरती नाव आहे तसेच पूर्ण नाव आणि स्पेलिंग भरायची आहे.

यानंतर तुम्ही आधार डिटेल्स या पर्यायांमध्ये तुमचा आधार नंबर टाका आणि जर तुमचे आधार कार्ड नंबर नसेल त्यांनी I Am Not Able To हा पर्याय निवडून घ्यायचा आहे.
आता तुमचा मोबाईल नंबर या पर्यायामध्ये सेल किंवा रिलेटिव्ह असे दोन पर्याय दिलेले आहेत त्यापैकी तुमचा स्वतःचा मोबाईल नंबर असल्यास सेल्फ निवडून मोबाईल नंबर टाका आणि व्हेरिफाय करून घ्या तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी आलेला असेल तो टाकून व्हेरिफाय करून घ्या.Voter ID card check online with photo


ई-मेल आयडी टाकण्याची गरज नाही आणि जर तुम्ही दिव्यांग असल्यास Percentage आणि संबंधित डॉक्युमेंट जसे UDID Card हा भरून घ्या आणि जर तुम्ही दिव्यांग नसलात तर हा पर्याय सोडून द्या आणि नेक्स्ट बटणावर क्लिक करा.

कुटुंबाची माहिती

यानंतर Relation Type या पर्यायामध्ये मतदान कार्ड वर वडिलांचे नाव आईचे नाव किंवा पतीचे नाव लावायचे असल्यास त्यानुसार पर्याय निवडून घ्या आणि Name of Relative मध्ये संबंधित व्यक्तीचे नाव भरून घ्या. आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक करा.

हे पण वाचा

दिल्ली लक्ष्मी योजना 2026: महिलांना दरमहा ₹2,500, पात्रता व अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

Address संबंधित माहिती

यानंतर Address ची माहिती भरावी. House Number, Apartment, शेजारील ठिकाण, Ward Number, गावाचे नाव, Post Office, Regional Post Office, Pincode आणि तालुका यासारखी माहिती इंग्लिश आणि मराठीमध्ये भरावी.

मतदान नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

  • आता तुम्हाला Address Proof यासंबंधीचे कागदपत्रे अपलोड करायचे आहे.
  • यामध्ये Water Connection Bill, Electricity Bill, Gas Connection Bill, Passbook, Passport, Land Owning Record, Rent Lease Deed, Sale Deed, Aadhaar Card यापैकी एक डॉक्युमेंट असणे आवश्यक आहे ज्यामध्ये Address Proof असणे आवश्यक आहे.

Address Proof साठी निवडलेले कागदपत्र निवडून Self Attested हा पर्याय निवडून अपलोड करून घ्या याची साईज 2mb पेक्षा जास्त नसावी.

नावाने मतदार ओळखपत्र शोधा

  • यानंतर Details Of My Family Member Already Included In The Electoral Roll At Current Address असा पर्याय येतो.
  • ज्या ठिकाणी सध्या नाव लावायचे आहे, त्या ठिकाणच्या मतदार यादीमध्ये कुटुंबातील वडील, आई, Husband किंवा इतर Family Member यापैकी कोणाचे नाव आधीपासून असेल तर त्यांची माहिती येथे भरावी.
  • Name Of Family Member मध्ये संबंधित कुटुंबातील व्यक्तीचे नाव भरावे. त्यांचा Voter ID Number उपलब्ध असल्यास तो भरता येतो. Voter ID Number उपलब्ध नसल्यास तो पर्याय सोडता येतो.
  • मात्र संबंधित कुटुंबातील व्यक्तीचे नाव भरावे.

कौटुंबिक माहिती

  • आता तुमच्यासमोर Details Of My Family Member Already Included In The Electoral Roll At Current Address हा पर्याय दिसेल.
  • यामध्ये तुम्ही ज्या ठिकाणी नाव लावणार आहात त्या ठिकाणच्या मतदार यादीमध्ये कुटुंबातील वडील आई किंवा पती तसेच इतर कुटुंबातील व्यक्ती यापैकी कोणाचे नाव आधीपासून असेल तर त्याची माहिती भरून घ्या.
  • Name Of Family Member या पर्यायांमध्ये कुटुंबातील व्यक्तीचे नाव भरा आणि त्यांचा Voter ID Number असल्यास तो भरून घ्या आणि नसेल तर तो पर्याय सोडून द्या.

मतदार नोंदणी पालकांची माहिती स्टेप बाय स्टेप

यानंतर Father किंवा Legal Guardian Name या पर्यायांमध्ये वडिलांचे किंवा पालकांचे नाव भरून घ्या आणि त्यांचा Voter ID Number म्हणजे EPIC Number उपलब्ध असल्यास तो टाका. हा नंबर Optional आहे. त्यानंतर Mother Name मध्ये आईचे नाव टाका.

  • आईचा Voter ID Number उपलब्ध असल्यास तो टाका. त्यानंतर तुमचे लग्न झाले असल्यास Spouse मध्ये Husband किंवा Wife चे नाव आणि उपलब्ध असल्यास त्यांचा Voter ID Number भरून घ्या.
  • यानंतर तीन महत्त्वाचे पर्याय दिसतील. My Name Exists In Electoral Roll Of Last SIR म्हणजे मागील SIR मध्ये स्वतःचे नाव आधीपासून आहे असा त्याचा अर्थ होतो. स्वतःचे नाव नसल्यास हा पर्याय निवडायचा नाही.
  • दुसरा पर्याय My Parents Name म्हणजे Father, Mother, Grand Father किंवा Grand Mother यांचे नाव Last SIR च्या Electoral Roll मध्ये आहे का, असा आहे. आई-वडील किंवा आजी-आजोबा यापैकी कोणाचे नाव असल्यास हा दुसरा पर्याय निवडायचा आहे.
  • तिसरा पर्याय म्हणजे Neither My Name Nor My Parents Name Exists In The Electoral Roll Of Last SIR.
  • म्हणजे स्वतःचे नाव, आई-वडिलांचे नाव किंवा कुटुंबातील संबंधित व्यक्तीचे नाव SIR च्या यादीमध्ये नसल्यास हा तिसरा पर्याय निवडायचा आहे.

तिसरा पर्याय म्हणजे Neither My Name Nor My Parents Name Exists In The Electoral Roll Of Last SIR. म्हणजे स्वतःचे नाव, आई-वडिलांचे नाव किंवा कुटुंबातील संबंधित व्यक्तीचे नाव SIR च्या यादीमध्ये नसल्यास हा तिसरा पर्याय निवडायचा आहे.
दुसरा पर्याय निवडल्यास SIR 2002 किंवा SIR 2025-26 यापैकी उपलब्ध असलेल्या यादीतील माहिती भरावी लागणार आहे.मतदार यादीत नाव शोधणे maharashtra

मतदार यादीत नाव शोधणे 2026

  • त्यासाठी voters.eci.gov.in या वेबसाईटवर जाऊन Search Your Name In Last SIR या पर्यायातून आई-वडील किंवा आजी-आजोबांचे नाव सापडून घ्या.
  • यासाठी महाराष्ट्र राज्य निवडावे. त्यानंतर जिल्हा आणि Assembly Constituency निवडावी.
  • संबंधित व्यक्तीचे पूर्ण नाव टाकून Captcha भरून Search करा.
  • Search केल्यानंतर आलेल्या नावांमध्ये आई-वडील किंवा आजी-आजोबांचे नाव शोधा.
  • नाव सापडल्यानंतर संबंधित व्यक्तीचे Account Name, Polling Station Number, Part आणि Serial Number अशी माहिती मिळेल.
  • ही माहिती Screenshot काढून ठेवा किंवा फॉर्म भरताना समोर ठेवा, कारण पुढे फॉर्ममध्ये ही माहिती आवश्यक आहे.2025-26 ची SIR यादी उपलब्ध झाल्यानंतर त्यामधूनही संबंधित माहिती पाहता येते. मतदार यादी अँप त्यासाठी उपलब्ध असलेल्या पर्यायामध्ये 2025-26 ची SIR यादी निवडून संबंधित माहिती मिळवता येईल.मतदार यादीत नाव शोधणे maharashtra

मतदार नोंदणी फॉर्म

  • आता फॉर्ममध्ये State, Assembly Constituency, Polling Station Number आणि Part Serial Number अशी माहिती भरा.
  • यादीमध्ये ज्या आई-वडिलांचे किंवा आजी-आजोबांचे नाव सापडले आहे, त्यांच्यासोबतचे आपले Relation निवडावे आणि Search करून घ्या.
  • सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर संबंधित व्यक्तीचे नाव आणि माहिती दिसेल.
  • माहिती योग्य असल्यास My Relative Name Exists In Electoral Roll हा पर्याय निवडून खाली Tick करून Next वर क्लिक करा.
  • यानंतर सध्याचा जिल्हा आणि ज्या गावामध्ये नाव लावायचे आहे त्या गावाचे नाव भरा.
  • ज्या पत्त्यावर सध्या राहत आहोत, त्या पत्त्यावर किती वर्षांपासून किंवा कधीपासून राहत आहोत, ती तारीख भरून घ्या.
  • त्यानंतर पूर्ण नाव आणि गावाचे नाव टाकून Done करा.
  • यानंतर भरलेली सर्व माहिती तपासून घ्या. आई-वडील किंवा आजी-आजोबा यांची माहिती आणि इतर सर्व माहिती योग्य आहे का, हे तपासा. त्यानंतर E-Sign And Submit वर क्लिक करा.

हे पण वाचा

PM Viksit Bharat Rojgar Yojana in Marathi: पात्रता, कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया एका क्लिकवर

E-sing

  • E-Sign And Submit केल्यानंतर Aadhaar Number विचारला जाईल.
  • आधार नंबर टाकून OTP घ्या. आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर OTP येईल.
  • तो OTP टाकून Terms Accept करून Submit वर क्लिक करा.
  • फॉर्म Submit झाल्यानंतर Reference ID मिळेल. हा Reference ID जपून ठेवा आणि त्याचा Screenshot काढून ठेवा.

मतदान कार्ड अर्ज Track Your Application

  • त्यानंतर Track Your Application या चौथ्या ऑप्शनमध्ये जाऊन अर्जाची स्थिती पाहता येते.
  • अर्ज कुठपर्यंत पोहोचला आहे, Submitted आहे का, पुढील प्रक्रिया काय आहे, माहिती बरोबर आहे का, अर्ज Reject झाला आहे का किंवा मंजूर झाला आहे का, याची माहिती येथे पाहता येते.
  • अर्ज Submitted झाल्यानंतर काही दिवसांनी BLO नियुक्त होईल.
  • त्यानंतर डॉक्युमेंट तपासले जातील आणि अर्ज Accept किंवा Reject झाल्याची माहिती मिळेल. अर्ज Accept झाल्यानंतर Voter Number Generate होईल.Download Election card by name

Voter Number Generate झाल्यानंतर Download मध्ये जाऊन Voter Number टाकून मतदान कार्ड Download करता येते. अशा पद्धतीने तुमची मोबाईल द्वारे मतदान कार्ड काढण्याची आणि मतदार यादीमध्ये नाव लावण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.

हे पण वाचा



Leave a Comment