प्रधानमंत्री आवास योजना 2.0 : प्रधानमंत्री आवास 2.0 योजनेमार्फत पुन्हा एक कोटी घरांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. जर तुम्हाला देखील या योजनेमार्फत एक पक्के घर बांधायचे असेल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी असणार आहे तर आज आपण प्रधानमंत्री आवास योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा यासाठी पात्रता काय आहे कागदपत्रे कोणकोणती लागणार आहे याची संपूर्ण माहिती बघणार आहोत या माहितीच्या आधारे तुम्ही घरबसल्या मोबाईलवरून ऑनलाइन अर्ज करू शकता.
प्रधानमंत्री आवास योजना 2.0 काय आहे?
सरकारतर्फे ई डब्ल्यू एस मध्यमवर्गीय व अल्प उत्पन्न असलेल्या वर्गांसाठी पक्के घर बांधून देण्यासाठी आर्थिक मदत केली जाते. तसेच प्रवासी व कामगार मजूर असलेल्या व्यक्तींसाठी कमी खर्चामध्ये राहण्याची व्यवस्था केली जाते या योजनेअंतर्गत सर्वांना पक्के घर मिळावे व त्यांचे जीवनमान सुधारावे हे सरकारचे लक्ष आहे याद्वारे सामाजिक विषमता दूर होऊन सर्वांना चांगल्या आयुष्याची सुरुवात करता येईल.
हे पण वाचा
दिल्ली लक्ष्मी योजना 2026: महिलांना दरमहा ₹2,500, पात्रता व अर्ज प्रक्रिया जाणून घ्या
प्रधानमंत्री आवास 2.0 योजनेच्या पात्रता
- लाभार्थीकडे पक्के घर नसावे.
- प्रधानमंत्री आवास योजनेचा पूर्वी लाभ घेतलेला नसावा.
- लाभार्थी हा आर्थिक दृष्ट्या कमकुवत म्हणजे ईडब्ल्यूएस कुटुंबातील असावा.
- त्याचे उत्पन्न तीन लाखापर्यंत असणे आवश्यक आहे.
- लाभार्थ्याजवळ 45 वर्ग मीटर पर्यंत पक्के घर बांधण्यासाठी जागा असावी.
- कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर देशभरात पक्के घर नसावे.
कागदपत्रे
- अर्जदाराचे आधार कार्ड त्यावर जन्मतारीख व्यवस्थित असणे अनिवार्य आहे.
- कुटुंबातील सदस्यांचे आधार कार्ड
- अर्जदाराचे आधार लिंक असलेले बँक खाते
- उत्पन्नाचा दाखला
- जमिनीचे कागदपत्र त्यामध्ये सातबारा
- घोषणापत्र
- रहिवासी दाखला
प्रधानमंत्री आवास 2.0 योजनेचा लाभ काय आहे
प्रधानमंत्री आवास 2.0 योजनेमार्फत ज्यांचे उत्पन्न तीन लाखापर्यंत आहे त्यांना अडीच लाख रुपयांची मदत दिली जाते
अल्प व मध्य उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांना होम लोनच्या व्याजावर मोठी सूट देण्यात येते.
त्यामध्ये पहिले आठ लाख रुपयावर 4% व्याज सवलत मिळते याद्वारे लाभार्थ्याची 1.8 लाखाची बचत होते.
हे अनुदान इ डब्ल्यू एस अल्प व मध्यम अशा तिन्ही वर्गासाठी लागू आहे.
प्रवास किंवा स्थलांतरित मजूर यांसाठी कमी दरामध्ये राहण्याची व्यवस्था केली जाते.
प्राधान्य
घराची मालकी ही महिलेच्या नावावर किंवा पती व पत्नी अशा जॉईंट खात्यावर असणे आवश्यक आहे.
प्रधानमंत्री आवास 2.0 योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा

- सर्वप्रथम तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर यायचे आहे.
- येथे आल्यानंतर तुमच्यासमोर प्रधानमंत्री आवास 2.0 योजनेचे होम पेज ओपन होईल व त्यावर तुम्हाला या योजनेअंतर्गत नवीन एक कोटी घरांसाठी ऑनलाईन अर्ज करा.असे नोटिफिकेशन दिसेल त्या नोटिफिकेशन ला कट करून घ्या
- आता तुमच्यासमोर पहिल्या क्रमांकाचा पर्याय Apply For PMAY-U 2.0 दिसेल त्यावरती क्लिक करा आता तुम्हाला हे दुसऱ्या पेज वरती घेऊन जाईल.PM Awas Yojana 2.0 Online Apply
- येथे आल्यानंतर तुम्हाला Appay for play u 2.0 या पर्यायावर ती क्लिक करायचे आहे.
- क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर या योजनेचे इन्स्टा स्ट्रक्चर पेज ओपन होईल ते तुम्हाला इंग्लिश व हिंदी या दोन्हीही भाषेत दिसेल ती माहिती तुम्ही वाचून घ्या आणि खाली प्रोसेस बटणावरती क्लिक करा.
- आता तुमच्यासमोर पात्रते संबंधीचे पेज ओपन होईल त्यावर तुमचे राज्य उत्पन्नाचे प्रमाण त्यानंतर तुम्ही ज्या प्रवर्गातून अर्ज करणार आहेत तो पर्याय निवडून घ्या.
- आता खाली स्क्रोल करून तुम्हाला दोन प्रश्न विचारले जातील त्यामध्ये तुमचे भारतामध्ये कोठे पक्के घर आहे का ते तुमच्या गरजेनुसार होय किंवा नाही निवडून घ्या.
- दुसरा प्रश्न तुम्हाला याआधी वीस वर्षात घरकुल योजनेचा लाभ मिळालेला आहे का ते तुम्ही होय किंवा नाही निवडून घ्या.
- असा फॉर्म भरून झाल्यानंतर eligibility check या बटनावर क्लिक करा.
- जर तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरला तर तुम्हाला consent या पेज वरती घेऊन येण्यात येईल आणि जर अपात्र ठरलात तर होम पेज वरती.
- तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला आता आधार ऑथेंटिकेशन करायचे आहे त्यामध्ये अर्जदाराचा आधार क्रमांक आणि नाव टाकून जनरेट ओटीपी या बटनावर क्लिक करा.
- आता तुमच्या लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तो टाकून सबमिट बटणावर क्लिक करा.
हे पण वाचा
PM Viksit Bharat Rojgar Yojana in Marathi: पात्रता, कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया एका क्लिकवर
प्रधानमंत्री आवास योजनेचा ऑनलाईन फॉर्म
- आता तुमच्यासमोर प्रधानमंत्री आवास योजनेचा ऑनलाईन फॉर्म ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला पाच स्टेप मध्ये तुमची माहिती भरायची आहे
- 1. वैयक्तिक माहिती
- त्यामध्ये तुम्ही यापूर्वी भरलेली माहिती आपोआप भरली जाईल आणि राहिलेली माहिती त्यामध्ये पॅन कार्ड जन्मतारीख मोबाईल नंबर ईमेल आयडी लिंग वैवाहिक स्थिती, अनाथ आहात का ही माहिती तुम्हाला भरून घ्यायची आहे.
- खाली स्क्रोल करून तुम्हाला वडिलांची माहिती भरायची आहे त्यामध्ये वडिलांचे नाव व आधार कार्ड नंबर त्याचप्रमाणे आईचे नाव आधार कार्ड नंबर आणि तुम्ही काय काम करत आहात ते निवडून घ्या.
- तुमचा धर्म जात शिक्षण ही माहिती भरून घ्या.
- आता खाली तुम्हाला एक प्रश्न विचारला जाईल तुम्ही पीएम स्वनिधी, गृहनिर्माण श्रमिक अंगणवाडी सेविका, पीएम विश्वकर्मा मार्फत सफाई कामगार ,कारागीर या योजनेचा लाभ घेतला असेल त्यानुसार होय किंवा नाही हा पर्याय निवडून सेव आणि कंटिन्यू बटणावर क्लिक करा.
- 2. कुटुंबाची माहिती
- आता तुम्हाला नवीन पेज वरती तुमच्या कुटुंबातील सदस्यांची माहिती भरायची आहे त्यामध्ये नाव जन्मतारीख लिंग आधार कार्ड ही माहिती प्रत्येक सदस्याची टाकून सेव आणि कंटिन्यू बटनावरती क्लिक करायचे आहे
- 3. घरकुला संबंधी माहिती
- घरकुला संबंधीच्या पात्रता हे पेज ओपन झाल्यानंतर त्यामध्ये आपोआप काही माहिती भरली जाईल.
- या पेज वरती तुम्हाला उत्पन्नाचा दाखला अपलोड करायचा ऑप्शन असेल तो अपलोड करून घ्या.
- तुम्ही केव्हापासून या शहरात राहत आहे ते वर्ष निवडून घ्या.
- तुमच्याकडे स्वतःचे घर आहे की नाही तो पर्याय निवडून सेव आणि कंटिन्यू बटणावरती क्लिक करा.
- 3. ऍड्रेस पेज
- या ऍड्रेस पेजवर तुम्हाला तीन स्टेप मध्ये माहिती भरावी लागेल.
- वर्तमान मधील पत्ता त्यामध्ये तालुका जिल्हा घर क्रमांक पिन कोड ही माहिती भरून घ्या
- कायमस्वरूपी पत्ता यामध्ये माहिती भरून घ्या
- प्रधानमंत्री आवास योजनेसाठी तुम्ही घर ज्या जमिनीवर बांधणार आहात त्याची माहिती भरा त्यावर भूमी सर्टिफिकेट अपलोड करून घ्या आणि सेव आणि कंटिन्यू बटनावरती क्लिक करा.
- बँक डिटेल्स
- आता तुम्हाला बँक अकाउंट ची माहिती भरायची आहे त्यामध्ये बँक अकाउंट नंबर आयएफएससी नंबर टाकून गेट बँक डिटेल्स या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या बँकेची माहिती तुम्हाला दिसेल
- त्यानंतर खाली दिलेल्या योजनेपैकी तुम्ही लाभ घेतला असेल तर होय किंवा नाही हा पर्याय निवडा.
- आता तुम्हाला हा अर्ज कोण भरत आहे त्यानुसार पर्यायातून एक पर्याय निवडून घ्या.
- त्यानंतर खाली तुम्हाला दोन पर्याय दिसतील त्यावरती चेक मार्क करून फायनल सेव बटनावर क्लिक करायचे आहे.
अशाप्रकारे तुमचा अर्ज प्रधानमंत्री आवास योजना 2.0 अर्बन च्या टीमला फॉरवर्ड केला जाईल व तुम्हाला एक रेफरन्स आयडी देण्यात येईल ही टीम तुम्ही दिलेल्या अड्रेस वरती येऊन तुम्हाला तुमचे कागदपत्रे जमिनीचे कागदपत्रे इत्यादी कागदपत्रे देऊन व्हेरिफाय करून घ्यायची आहे ती माहिती टीम द्वारे चेक केल्यानंतर तुम्ही प्रधानमंत्री आवास 2.0 योजनेसाठी पात्र आहात की नाही ते ठरवले जाईल तुम्ही जर पात्र असाल तर सरकारद्वारे या योजनेची रक्कम वितरित केली जाईल त्यावेळी ती तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.
हे पण वाचा
- PM Surya Ghar Muft Bijli Yojana 2026: मोफत सोलर पॅनेल, ₹78,000 सबसिडी आणि 300 युनिट मोफत वीज; असा करा ऑनलाईन अर्ज
- PMUY 3.0 Online Apply: घरबसल्या उज्ज्वला योजनेत गॅस कनेक्शनसाठी असा करा अर्ज
माझे नाव मंगेश आहे. मला सरकारी योजना,शेतकरी योजना,लाडकी बहीण योजना या संबंधित अन्य शासनाच्या योजनांची माहिती देण्याचा पाच वर्षाचा अनुभव आहे