Life Certificate मोबाईलमधूनच काढा! पेन्शनधारकांसाठी हयातीचा दाखला काढण्याची पूर्ण प्रक्रिया

Life Certificate मोबाईलमधून हयातीचा दाखला कसा काढायचा?

हयातीचा दाखला म्हणजेच त्याला आपण जीवन प्रमाणपत्र किंवा लाईफ सर्टिफिकेट सुद्धा म्हणतो. तर सर्व जे काही पेन्शन धारक आहेत त्यांना हे लाईफ सर्टिफिकेट म्हणजेच हयातीचा दाखला काढणं बंधनकारक आहे. वर्ष संपत आल्यानंतर हा हयातीचा दाखला काढणं सर्व पेन्शन धारकांना बंधनकारक आहे आणि हा हयातीचा दाखला तुम्ही तुमच्या मोबाईल मधून फक्त पाच मिनिटांमध्ये घर बसल्या काढू शकता. तर हा ऑनलाईन फॉर्म कशाप्रकारे भरायचा याची माहिती आज आपण बघणार आहोत ती खालील प्रमाणे.

Life Certificate मोबाईलमधून कसे काढायचे?

त्यासाठी तुम्हाला जीवन प्रमाण आणि आधार फेस आरडी ॲप इन्स्टॉल करावे लागणार आहे.त्याची माहिती खालील प्रमाणे आहे.

Life Certificate
Life Certificate


सर्वप्रथम प्ले स्टोर वरती यायचं. प्ले स्टोर वरती येऊन तुम्हाला दोन ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे. पहिले आहे जीवन प्रमाण. जीवन प्रमाण सर्च करा आणि हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्या.

त्यानंतर दुसरे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं ते म्हणजे आधार फेस आरडी. अशा पद्धतीने सर्च करा. आधार फेस आरडी असं सर्च केलं की हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं. आधार फेस आरडी हे ॲप्लिकेशन फक्त तुम्हाला इन्स्टॉल करून सोडून द्यायचं आहे. याला काही करायची गरज नाही.

हे पण वाचा

Voter ID Online Apply अर्ज करा ecinet मोबाइल ॲपवरून घरबसल्या तेही 2 मिनिटात

जीवन प्रमाण ॲप ओपन करा

आता जे आपण पहिलं ॲप्लिकेशन इन्स्टॉल केलं होतं ते आपल्याला ओपन करायचे आहे. ते म्हणजे जीवन प्रमाण. हे जीवन प्रमाण ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून ओपन करा.

जीवन प्रमाण ॲप ओपन झाल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल. इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर, मोबाईल नंबर, नंबर, ईमेल आयडी विचारला जाईल. तर इथे कोणाचा टाकायचा? घरातील कुठल्याही व्यक्तीचा तुम्ही इथे टाकू शकता. आधार नंबर, मोबाईल नंबर, ईमेल आयडी कुणाचाही टाका आणि सबमिट करा.

सबमिट केल्यानंतर मोबाईलवरती एक ओटीपी येईल. तो ओटीपी टाकून इथे पुन्हा आपल्याला ओटीपी टाकून सबमिट करायचा आहे.

ऑपरेटरची माहिती भरा

सबमिट केल्यानंतर आता तुम्हाला ऑपरेटर नेम विचारले जाईल. म्हणजे ज्या व्यक्तीचा आपण आधार नंबर टाकला, त्याचं नाव टाकायचं आहे. इथे या बॉक्सवरती टिक करायचं आणि खाली स्कॅन बटनावरती क्लिक करायचं.

Life Certificate
Life Certificate

आता ज्या व्यक्तीचा आधार नंबर टाकलेला, त्याचा आपल्याला चेहरा घ्यायचा आहे. त्यासाठी हे ऑटोमॅटिक आधारचा ॲप ओपन करा. त्याला एक्सेप्ट करायचं आणि प्रोसीड करायचं आहे.

तुमच्यासमोर एक गोल ओपन होईल. त्या गोलमध्ये ज्या व्यक्तीचा आधार नंबर टाकला आहे त्या व्यक्तीला उभं करायचे किंवा सेल्फीने सुद्धा करू शकता. याबरोबर डोळे उघडझाप, उघडझाप डोळे करायचे आहे समोर बघून. तर हे ऑपरेटर सक्सेसफुली होईल.

ऑपरेटर सक्सेसफुली झाल्यानंतर,आता तुम्ही कोणाचेही जीवन प्रमाणपत्र काढू शकता.

पेन्शनरची माहिती भरा

आता तुमच्यासमोर पेन्शन आयडेंटिफिकेशन पर्याय दिसेल . तिथे माहिती कोणाची टाकणार? ज्या व्यक्तीचा तुम्हाला हयातीचा दाखला काढायचा आहे, त्या व्यक्तीचा आधार नंबर आणि त्याचा मोबाईल नंबर टाकून सबमिट करायचा आहे.

कुणाचाही कितीही तुम्ही इथे आता हा दाखला काढू शकता. आता इथे ओटीपी टाकायचा आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचे आहे. तर पेन्शनर व्यक्तीला ओटीपी येईल. तो ओटीपी टाकून सबमिट केलं की इथे पहा पेन्शनरची सगळी माहिती येईल.

पेन्शनरचं नाव असेल, पेन्शन कुठली आहे, कुठल्या कंपनीची पेन्शन आहे, सगळी माहिती येईल.

जर इथे काही येत नसेल तर वरती पीपीओ नंबर तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि तिथे पीपीओ नंबर जर सिलेक्ट केला आणि काहीच नाही आलं तर तुम्हाला तो पीपीओ नंबर तिथे ॲड करावा लागेल. एजन्सी ॲड करावी लागते.

तर इथे बऱ्याच जणांचे 99 टक्के लोकांचे इथे येतातच. नाव वगैरे सगळे ऑटोमॅटिकली येतं. सगळी माहिती बरोबर आहे का ते चेक करायचं. खाली शेवट करायचं आणि नेक्स्ट करायचे आहे.

माहिती तपासून सर्टिफाय करा

आता ही सगळी माहिती तुमच्यासमोर ओपन होईल. ही माहिती तुमची बरोबर आहे का एकदा चेक करायची. फक्त आणि खाली सर्टिफाय दॅट दोन बॉक्स आहेत, त्यावरती टिक करून सबमिट करायचा आहे.

सबमिट केलं की आता आपल्याला पुन्हा फेस घ्यायचा आहे. एक्सेप्ट करून स्कॅन बटनावरती क्लिक करायचे आहे. या बॉक्सवरती टिक करून स्कॅन करा आणि ज्या व्यक्ती आहे, जो पेन्शनर व्यक्ती आहे त्याचा इथे फेस घ्यायचा आहे.

त्यांना डोळे उघडझाप करायला सांगायचे आहे. डोळे उघडझाप झाले की तुमचे फेस एक्सेप्ट यशस्वीरित्या पूर्ण होईल.

त्यानंतर तुम्हाला एक प्रमाण आयडी तुम्हाला येईल. त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. क्लोज करा किंवा मेसेज सुद्धा आला असेल, तो सेव करून ठेवा.

लाईफ सर्टिफिकेट डाउनलोड करा

आता गुगलवरती या. या गुगलवरती येऊन जीवन प्रमाण सर्च करा. पहिली पेन्शनर लॉगिन पहिलीच वेबसाईट आहे. या पेन्शनर लॉगिनच्या वेबसाईटवरती या.

जो काही मेसेजमध्ये प्रमाण आयडी आलेला आहे तो प्रमाण आयडी इथे टाका किंवा जो स्क्रीनशॉट आपण काढला होता, जो प्रमाण आयडी समोर आला होता तो प्रमाण आयडी इथे टाका आणि कॅप्चा टाकून जनरेट ओटीपी वरती क्लिक करा.Life Certificate Online Registration in Mobile

जो पेन्शनर व्यक्ती आहे त्याच्यावरती ओटीपी जाईल. तो ओटीपी इथे टाकून कॅप्चा टाकून लॉगिन बटनावरती क्लिक करायचे आहे.

आपलं काम आता झालेलं आहे. आता तुमच्यासमोर, डाऊनलोड लाईफ सर्टिफिकेट हिरव्या बटनाचं क्लिक हिअर बटन आहे. त्यावरती क्लिक केलं की तुमचं जे काही हयातीचा दाखला आहे, लाईफ सर्टिफिकेट म्हणतो आपण किंवा जीवन प्रमाण म्हणतो, हे डाउनलोड होईल.

तर अशा पद्धतीने तुम्ही मोबाईलमधून फक्त पाच मिनिटांमध्ये प्रोसेस करू शकता.

निष्कर्ष

पेन्शनधारकांसाठी हयातीचा दाखला म्हणजेच जीवन प्रमाणपत्र किंवा लाईफ सर्टिफिकेट महत्त्वाचे आहे. जीवन प्रमाण ॲप आणि आधार फेस आरडीच्या मदतीने मोबाईलमधून घरबसल्या हयातीचा दाखला काढण्याची प्रक्रिया करता येते. वरील प्रक्रियेनुसार आवश्यक माहिती भरून आणि फेस ऑथेंटिकेशन पूर्ण करून जीवन प्रमाणपत्र डाउनलोड करता येते.

डिस्क्लेमर

या लेखामध्ये हयातीचा दाखला म्हणजेच जीवन प्रमाणपत्र काढण्याची माहिती सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. ॲप किंवा वेबसाइटवरील प्रक्रिया, नियम आणि उपलब्ध सुविधा वेळेनुसार बदलू शकतात. त्यामुळे हयातीचा दाखला काढण्यापूर्वी अधिकृत जीवन प्रमाण वेबसाइट किंवा संबंधित विभागाकडून माहिती तपासावी.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

हयातीचा दाखला म्हणजे काय?

हयातीचा दाखला म्हणजेच जीवन प्रमाणपत्र किंवा Life Certificate होय. पेन्शनधारकाच्या हयातीची पडताळणी करण्यासाठी याचा उपयोग केला जातो.

हयातीचा दाखला मोबाईलमधून काढता येतो का?

होय, जीवन प्रमाण ॲप आणि आधार फेस आरडीच्या मदतीने मोबाईलमधून हयातीचा दाखला काढण्याची प्रक्रिया करता येते.

हयातीचा दाखला काढण्यासाठी कोणते ॲप लागते?

यासाठी जीवन प्रमाण ॲप आणि आधार फेस आरडी ॲप आवश्यक आहे.

हयातीचा दाखला काढण्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे का?

होय, जीवन प्रमाणपत्राच्या प्रक्रियेसाठी पेन्शनधारकाचा आधार नंबर आवश्यक असतो.

जीवन प्रमाणपत्र काढल्यानंतर ते डाउनलोड करता येते का?

होय, प्रमाण आयडीच्या मदतीने पेन्शनर लॉगिन करून Life Certificate डाउनलोड करता येते.

हयातीचा दाखला काढण्यासाठी मोबाईल नंबर आवश्यक आहे का?

होय, प्रक्रियेदरम्यान मोबाईल नंबरवर OTP प्राप्त होतो, त्यामुळे संबंधित मोबाईल नंबर आवश्यक असतो.

हे पण वाचा

Leave a Comment