Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
योजना मराठी Yojanamarathi

सर्व सरकारी योजनांची माहिती

योजना मराठी Yojanamarathi

सर्व सरकारी योजनांची माहिती

  • Home
  • शेतकरी योजना
    • कामाची माहिती
  • सरकारी योजना
  • About Us
    • Contact Us
    • Privacy policy
    • Disclaimer
    • Terms and Conditions
  • Home
  • शेतकरी योजना
    • कामाची माहिती
  • सरकारी योजना
  • About Us
    • Contact Us
    • Privacy policy
    • Disclaimer
    • Terms and Conditions
Close

Search

  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Subscribe
PM Kisan 24th Installment
शेतकरी योजना

PM Kisan 24th Installment: 24 वा हप्ता ऑक्टोबरमध्ये की नोव्हेंबरमध्ये? शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती

By मंगेश भोंगळ
September 23, 2026 5 Min Read
0

PM Kisan 24th Installment: प्रधानमंत्री किसान महा सन्माननिधी योजनेचा 24 वा हफ्ता वाटप होणे बाकी असून या हप्त्याकडे देशातील शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. पीएम किसन योजनेची 23 हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खाते मध्ये जमा झाल्यानंतर 24 वा हप्ता कधी जमा होईल.यासाठी शेतकरी वाट पाहत आहे तुम्ही पण पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल पण तुम्हाला 24 वां हफ्ता कधी मिळणार आहे? हे तुम्हाला माहिती नसेल? हा 24 हप्ता ऑक्टोंबर मध्ये जमा होईल की नोव्हेंबर मध्ये! याचीच माहिती आपण बघणार आहोत. त्याचबरोबर ही योजना काय आहे? तिचे लाभ,पात्रता, कागदपत्रे, ईकेवायसी कशी करायची? बेनिफिशयरी मध्ये नाव कसे चेक करायचे?ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा? या योजनेची संपूर्ण डिटेल माहिती एकाच लेखामध्ये आपण दिलेली आहे. तरी हा लेख शेवटपर्यंत वाचल्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ नक्कीच मिळेल ही मला खात्री आहे. तर ही माहिती खालील प्रमाणे आहे.

Table of Contents

Toggle
  • PM Kisan 24th Installment: कधी मिळेल
  • कोण पीएम किसान योजनेपासून वंचित राहू शकतात
  • पीएम किसान योजनेचा लाभ मिळेल की नाही ते कसे चेक करायचे
  • पीएम किसान सन्माननिधी योजना काय आहे
  • पीएम किसान योजनेचा 2026 उद्देश्य
  • प्रधानमंत्री पीएम किसान योजनेच्या पात्रता
  • या योजनेसाठी लागणारे कागदपत्रे
  • पीएम किसान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा
  • पीएम किसान योजनेसाठी ऑफलाईन अर्ज
  • पीएम किसान योजनेसाठी केवायसी कशी करायची
  • पीएम किसान योजनेमध्ये बेनिफिशियरी स्टेटस कसे चेक करायचे
  • पीएम किसान यादीत नाव असे चेक करा

PM Kisan 24th Installment: कधी मिळेल

प्रधानमंत्री किसान महा सन्मान निधी योजनेचा इतिहास बघता असे लक्षात येते, की पीएम किसान योजनेचे हप्ते वर्षातून जवळपास दर ४ महिन्याला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात.या योजनेचे आतापर्यंत 23 हप्ते शेतकऱ्यांना दिलेले आहे.या योजनेचा 23 वा हप्ता जून मध्ये जमा झाला होता.म्हणजे ऑक्टोंबर मध्ये तुम्हाला हा हप्ता मिळू शकतो.मागच्या वर्षी 2025 ला वित्तीय वर्षाचा दुसरा हप्ता १९ नोव्हेंबर रोजी मिळाला होता. तर 2024 ह्या वर्षी 5 ऑक्टोबरला १८ वा हप्ता देण्यात आला होता. यावरून मागचे हप्ते 5 ऑक्टोबर पासून १९ नोव्हेंबर पर्यंत जमा केलेले आहेत असे लक्षात येते. त्यानुसार आता सुद्धा असा अंदाज लावला जात आहे की याच कालावधीमध्ये 24 वा हप्ता जमा केला जाऊ शकतो.

हे पण वाचा

महिला शेतकरी प्रमाणपत्र 2026: अर्ज कसा करायचा? पात्रता, कागदपत्रे आणि संपूर्ण प्रक्रिया

काही लोक असाही अंदाज लावत आहे की 24 वा हफ्ता हा दिवाळीच्या आधी सणासुदीला पैशाची गरज असल्याने तेव्हा सरकार जारी करू शकते परंतु या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही.

कोण पीएम किसान योजनेपासून वंचित राहू शकतात

PM Kisan 24th Installment
PM Kisan 24th Installment

जर शेतकऱ्यांनी ई केवायसी केली नसेल तर त्यांना 24 वा हप्ता मिळण्यास अडचण निर्माण होऊ शकते ई केवायसी करणे हे पीएम किसान योजनेसाठी सरकारने आता अनिवार्य केलेले आहे.जर तुम्ही केवायसी केली नसेल तर आत्ताच करून घ्या.नाहीतर तुम्हाला 24 वा हप्ता मिळणार नाही.
ज्या शेतकऱ्यांनी भु -सत्यापण केलेले नाही त्यांनाही हा हफ्ता मिळण्यास अडचण निर्माण होणार आहे. यामध्ये तुमच्या जमिनीचे व्हेरिफिकेशन केले जाते. त्याचबरोबर बँक खात्याला आधार लिंक करणे आवश्यक आहे. हे तुम्ही बँकेत जाऊन देखील करू शकता. ही प्रक्रिया आतापर्यंत देशातील जवळजवळ 15 लाख शेतकऱ्यांनी केली नसल्यामुळे ते अपात्र ठरलेले आहेत याची तुम्ही नोंद घ्या.

पीएम किसान योजनेचा लाभ मिळेल की नाही ते कसे चेक करायचे

पी एम किसान योजनेचा लाभ तुम्ही घरबसल्या चेक करू शकता.

  • यासाठी तुम्हाला शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे. तिथे तुम्हाला KNOW Your स्टेटस वर क्लिक करायचे आहे.
  • यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकून captcha code भरून सबमिट बटणा वरती क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर तुमचा registered मोबाईल नंबर वर एक OTP येईल त्यावरून व्हेरिफिकेशन करून घ्या.
  • आता land seeding, E-kyc आणि आधार shading चे स्टेटस तुम्हाला दिसेल.


जर हे सर्व पर्याय पूर्ण असतील तर तुम्हाला 24 वा हप्ता मिळेल. आणि जर यापैकी कोणताही एक पर्याय अपूर्ण असेल तर तुम्हाला हप्ता मिळण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो.

पीएम किसान सन्माननिधी योजना काय आहे

पी एम किसान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपयांची आर्थिक मदत केली जाते. दर ४ महिन्याला २,००० रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डीबीटी मार्फत जमा केले जातात. या योजनेची सुरुवात 24 फेब्रुवारी 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गोरखपूर उत्तर प्रदेश येथून करण्यात आली होती.सुरुवातीला फक्त दोन हेक्टर क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळत असत परंतु आता यासाठी सर्व शेतकरी पात्र आहेत. पी एम किसान योजनेअंतर्गत सरकार दरवर्षी 75 हजार कोटी रुपयांचे वाटप शेतकऱ्यांना करत असते.

पीएम किसान योजनेचा 2026 उद्देश्य

पूर्वीपासूनच भारत हा शेतीवर आधारित देश आहे. भारतातील जवळपास 75 टक्के लोक आजही शेती करतात शेतकऱ्यांना शेती करताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.त्याचबरोबर शेतीसाठी बी बियाणे, मशागत,फवारणी करावी लागते. यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज असते. याच उद्देशाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी सरकारने पीएम किसान महासन्मान निधी योजनेची सुरुवात केलेली आहे.

हे पण वाचा

शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! घरबसल्या ई-पीक पाहणी करा, जाणून घ्या सोपी पद्धत DCS MH e-peek pahani

प्रधानमंत्री पीएम किसान योजनेच्या पात्रता

  • लाभार्थी शेतकरी हा भारतीय नागरिक असावा.
  • लाभार्थी शेतकरी हा कोणत्याही सरकारी नोकरीत रुजू नसावा.
  • लाभार्थ्याकडे स्वतःच बँक खाते असणे आवश्यक आहे.

या योजनेसाठी लागणारे कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • मतदान कार्ड केव्हा ड्रायव्हिंग लायसन्स
  • शेत जमिनीचा दाखला
  • बँक पासबुक
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट साईज फोटो

पीएम किसान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा

PM Kisan 24th Installment
PM Kisan 24th Installment
  • सर्वप्रथम पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
  • pmkisan.gov.in/
  • तुमच्यासमोर होम पेज ओपन होईल. त्यावरती तुम्हाला फॉर्मर कॉर्नर द्वारा न्यू फार्मर रजिस्ट्रेशन हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे.

  • तुमच्या समोर न्यू फॉर्म रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल.तिथे ग्रामीण व शहरी असे दोन पर्याय दिसतील तुम्ही जर ग्रामीण भागातील असाल तर rural farmer रजिस्ट्रेशन वर क्लिक करा आणि तुम्ही जर शहरी भागातील असताल तर urban farmer रजिस्ट्रेशन वर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकून राज्य निवडायचे आहे तुम्हाला एक captcha code देण्यात येईल तो टाकून सबमिट बटणावर क्लिक करा.
  • आता तुमची वैयक्तिक माहिती भरून तुम्ही या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.

पीएम किसान योजनेसाठी ऑफलाईन अर्ज

काही शेतकऱ्यांना ऑनलाइन प्रक्रिया अवघड वाटत असेल.त्यांनी आपला फॉर्म जवळील जनकल्याण केंद्र मध्ये जमा करायचा आहे. त्यानंतर तुमच्या अर्जाची तपासणी केली जाईल. व तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरला तर तुम्हाला योजनेचा लाभ नक्कीच मिळणार आहे.

पीएम किसान योजनेसाठी केवायसी कशी करायची

प्रधानमंत्री किसान योजनेचा फायदा घेण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना EKYC करणे अनिवार्य केलेले आहे. नाही तर या योजनेचे हप्ते मिळण्यास अडचण निर्माण होऊ शकते.तर ही केवायसी कशी करायची या संदर्भात खाली माहिती आपण दिलेली आहे.

  • तुम्हाला शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला जायचे आहे. तुमच्या समोर एक होम पेज ओपन होईल.
  • त्यावर एक केवायसी हा पर्याय तुम्हाला दिसेल त्यावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर टाकून सर्च या बटणावर क्लिक करा.
  • तुमच्या रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तो ओटीपी टाकून सबमिट बटनावर क्लिक करा.

अशाप्रकारे तुम्ही पीएम किसान योजनेसाठी लागणारी ही केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता.

पीएम किसान योजनेमध्ये बेनिफिशियरी स्टेटस कसे चेक करायचे

PM Kisan 24th Installment
PM Kisan 24th Installment
  • सर्वप्रथम सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर तुम्हाला जायचे आहे.
  • तुमच्यासमोर होम पेजवर तुम्हाला पीएम किसान बेनिफिशियरी पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकून ओटीपी या बटनावर क्लिक करा आणि गेट कोड यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर बेनिफिशियरी स्टेटस दिसेल.

पीएम किसान यादीत नाव असे चेक करा

  • पीएम किसान बेनिफिशियरी यादीत तुम्हाला नाव चेक करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईटवर जायचे आहे.
  • वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला पीएम किसान बेनिफिशियरी या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • आता तुमचे गाव, राज्य, तालुका इत्यादी माहिती भरून गेट रिपोर्ट वरती क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर तुम्हाला पीएम किसान बेनिफिशियरी यादी उपलब्ध होईल व तुम्ही त्यामध्ये तुमचे नाव चेक करू शकता.

हे पण वाचा

  • महिला शेतकरी प्रमाणपत्र 2026: अर्ज कसा करायचा? पात्रता, कागदपत्रे आणि संपूर्ण प्रक्रिया
  • शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! घरबसल्या ई-पीक पाहणी करा, जाणून घ्या सोपी पद्धत DCS MH e-peek pahani






Views: 77

Tags:

cm किसान कल्याण योजनाcm किसान योजनाpm किसान योजनाकिसान योजनाकिसान सम्मान निधिनमो शेतकरी महा सन्मान निधी योजनानमो शेतकरी महासंघ निधी योजनानमो शेतकरी योजना 9 हप्तानमो शेतकरी योजना पीएम किसान योजनानमो शेतकरी सन्मान निधी योजनापी एम किसान योजनापीएम किसान योजनापीएम किसान सम्मान निधि योजनाप्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजनामुख्यमंत्री किसान योजना महाराष्ट्र
Author

मंगेश भोंगळ

माझे नाव मंगेश आहे. मला सरकारी योजना,शेतकरी योजना,लाडकी बहीण योजना या संबंधित अन्य शासनाच्या योजनांची माहिती देण्याचा पाच वर्षाचा अनुभव आहे

Follow Me
Other Articles
PM Viksit Bharat Rojgar Yojana in Marathi
Previous

PM Viksit Bharat Rojgar Yojana in Marathi: पात्रता, कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया एका क्लिकवर

दिल्ली लक्ष्मी योजना
Next

दिल्ली लक्ष्मी योजना 2026: महिलांना दरमहा ₹2,500, पात्रता व अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Post

  • एसटी बस ऑनलाइन तिकीट बुकिंग कसे करावे?एसटी बस ऑनलाइन तिकीट बुकिंग कसे करावे? मोबाईलवरून सीट बुक करा
  • PM Kisan 24th Installment 2026PM Kisan 24th Installment 2026: शेतकऱ्यांच्या खात्यात ₹2,000 कधी जमा होणार? तारीख, e-KYC आणि स्टेटस तपासा
  • महाराष्ट्र शेतकरी कर्जमाफी यादी 2026महाराष्ट्र शेतकरी कर्जमाफी यादी 2026: चौथी यादी, KYC आणि नवीन अपडेट
  • gavacha nakasha onlineगावाचे 13 प्रकारचे नकाशे ऑनलाइन कसे काढायचे? मोबाईलवरून PDF डाउनलोड कराgavacha nakasha online
  • Life CertificateLife Certificate मोबाईलमधूनच काढा! पेन्शनधारकांसाठी हयातीचा दाखला काढण्याची पूर्ण प्रक्रिया
  • कामाची माहिती
  • शेतकरी योजना
  • सरकारी योजना
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
Copyright 2026 — Yojanamarathi. All rights reserved. Blogsy WordPress Theme