PM Viksit Bharat Rojgar Yojana in Marathi मित्रांनो जर तुम्ही कंपनीमध्ये नोकरी करण्याचे विचार करत असाल किंवा तुमची कंपनीमध्ये नवीन भरती होणार असेल.किंवा झाली असेल. तर तुमच्यासाठी केंद्र सरकारने एक भन्नाट योजना आणलेली आहे. या योजनेचे नाव प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार असे ठेवण्यात आलेली आहे.या योजनेअंतर्गत केंद्र सरकार नवीन भरती झालेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाच्या खर्चासाठी आर्थिक मदत करणार आहे. तर तुम्ही देखील असा विचार करत असाल की आपल्या प्रशिक्षणाचा खर्च कसा पूर्ण करावा? तर आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही.
प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार या योजनेची सुरुवात 1 ऑगस्ट 2025 पासून 2027 पर्यंत चालू असणार आहे.जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर? या योजनेच्या पात्रता,कागदपत्रे, निकष आणि कोणाला लाभ मिळणार आहे ?आणि यासाठी अर्ज कसा करायचा? रक्कम किती मिळणार आहे ?याची संपूर्ण माहिती आज आपण या लेखात दिलेली आहे. तरी तुम्ही शेवटपर्यंत हा लेख वाचा आणि योजनेचा लाभ मिळावा.
हे पण वाचा
PMUY 3.0 Online Apply: घरबसल्या उज्ज्वला योजनेत गॅस कनेक्शनसाठी असा करा अर्ज
PM Viksit Bharat Rojgar Yojana in Marathi का महत्वपूर्ण आहे.
2047 पर्यंत भारताला विकसित बनवण्याचे उद्देशाने प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही सुरू करण्यात आलेली आहे. भारताला सामाजिक सुरक्षा आणि देशातील तरुणांना नोकरी देऊन त्यांच्या जीवनाला एक नवीन आशा देण्याच्या उद्देशाने ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
प्रधानमंत्री विकसित भारत योजनेचे मिळणारे लाभ
नवीन कर्मचाऱ्यांसाठी
सर तुम्ही नवीनच कंपनीमध्ये नोकरीच रुजू झाले असाल.तर तुम्हाला केंद्र सरकारकडून 15000 रुपयांचे प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे. हे पैसे तुमच्या बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने जमा केले जातील.याची माहिती खालील प्रमाणे आहे.
पहिला हप्ता.
तुम्हाला कंपनीमध्ये रुजू होऊन सलग सहा महिने पूर्ण झाले तर तुमच्या सरासरी (ईपीएफ) वेतनाच्या निम्म्या रकमेचा पहिला हप्ता (कमीत कमी साडेसात हजार रुपये तुम्हाला दिले जातील)
दुसरा हप्ता.
बारा महिने पूर्ण झाल्यानंतर उरलेली रक्कम दुसऱ्या हप्त्यामध्ये एका निश्चित मूर्तीसाठी तुमच्या बँक खात्यामध्ये सुरक्षित ठेवली जाईल ती रक्कम इलेक्ट्रॉन-चलन -कम-रिटर्न (ecr) भरल्यानंतर 45 दिवसाच्या तुमच्या खात्यात जमा केली जाईल.
कंपनी व उद्योगासाठी मिळणाऱ्या मासिक अनुदान
नवीन नोकऱ्या निर्माण करणाऱ्या कंपनी व उद्योगासाठी केंद्र सरकारकडून या योजनेमार्फत अनुदानाच्या स्वरूपात आर्थिक मदत करण्याची घोषणा केलेली आहे.
मुदतीचा कालावधी
- सामान्य आस्थापनासाठी व्यतिरिक्त रोजगारावर दोन वर्षांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे.
- विनिर्माण क्षेत्रासाठी अनुदान तिसऱ्या व चौथ्या वर्षासाठी देखील सुरू राहील.
पगारानुसार दरमहा मिळणारे अनुदान
- दहा हजार किंवा त्यापेक्षा कमी वेतन असेल तर महा 1000 रुपये किंवा वेतनाच्या दहा टक्के दराने अनुदान दिले जाईल.
- दहा हजार ते वीस हजार पर्यंतचे वेतन असेल तर मला 2000 पर्यंत अनुदान दिले जाईल.
- वीस हजार ते एक लाख पर्यंत वेतन असल्यास तर 3 हजार रुपये पर्यंत अनुदान दिले जाईल.
अनुदान जमा होण्याची प्रक्रिया
- महिन्याचा हप्ता सहा महिन्याचे इलेक्ट्रॉनिक चालन कम रिटर्न भरल्यानंतर सहा महिन्यांनी ही रक्कम दिली जाईल.
- हे अनुदान भेट कंपनीच्या पॅन कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यात डीबीटी मार्फत जमा केले जाईल.
प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचे निकष

प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी रोजगार निर्मितीची ठरवून दिलेली मर्यादा चालू ठेवावी लागेल जर कंपनीमध्ये 50 पेक्षा कमी कर्मचारी असेल तर किमान दोन वर्ष रोजगार आणि 50 किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या कंपन्यांना किमान पाच नवीन रोजगार तयार करावी लागतील ज्या महिन्यात ही अट पूर्ण होणार नाही त्या महिन्याचे अनुदान कंपनीला मिळणार नाही त्याच प्रकारे पहिल्यांदा नोकरीला लागलेल्या कर्मचाऱ्यांना दुसरे हप्ते ची रक्कम मिळविण्यासाठी EPFO पोर्टल वरील दिलेल्या वित्तीय साक्षरता अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक आहे.
हे पण वाचा
प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचे पात्रता
नवीन कर्मचाऱ्यांसाठी
जर तुम्हाला या योजनेद्वारे मिळणाऱ्या पंधरा हजार रुपयांचे अनुदान मिळवायचे असेल तर खालील पात्रता पूर्ण करावी नाही आवश्यक आहे.
- नवीन कर्मचारी असणे आवश्यक आहे यापूर्वी ईपीएफओ किंवा ट्रस्टचे सदस्य नसावे.
- नोकरीत रुजू होण्याचा कालावधी एक ऑगस्ट 2025 ते 31 जुलै 2027 पर्यंत असावा.
- उमंग ॲपवर फेस ऑथेंटीकेशन द्वारे यु ए एन प्रमाणीकरण झालेले असावे.
- कंपनीकडून सलग सहा महिने नियमित ईपीएफ जमा असणे आवश्यक आहे.
- हंगामी कामगारांनी सलग सहा महिने एकाच कंपनीमध्ये काम करणे आवश्यक आहे.
पुन्हा कामावर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पात्रता
- अर्जदाराकडे पूर्वीचे ईपीएफ खाते असावे.
- योजनेच्या नोंदणी कालावधीत ईपीएफओ नोंदणीकृत कंपनीत पुन्हा रुजू होणे आवश्यक आहे.
- बायोमेट्रिक किंवा फेस ऑथेंटीकेशन द्वारे आधार प्रमाणित युएएन असणे आवश्यक आहे.
कंपनी व उद्योगांसाठी पात्रता
- कंपनी ही ई पी एफ कायदा 1952 नुसार नोंदणीकृत असावी.
- नियमित पीएफ योगदानासाठी ECR भरणे आवश्यक आहे.
- 50 पेक्षा कमी कर्मचाऱ्यांसाठी किमान दोन तर 50 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांसाठी किमान पाच नवीन नोकऱ्या निर्माण करणे आवश्यक आहे.
- कंपनीचा पॅन जीएसटी एन क्रमांक आणि पॅन कार्ड लिंक खाते देणे आवश्यक आहे.
प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचे कागदपत्रे

अर्ज करण्यासाठी
- कंपनीचे अधिकृत पॅन कार्ड
- अधिकृत जी एस टी एन माहिती
- उत्पादन स्थिती सिद्ध करणारे अधिकृत कंपनी नोंदणी प्रमाणपत्र
लाभ मिळवण्यासाठी लागणारे कागदपत्रे
- ठरवून दिलेल्या पी एफ योगदानसह मासिक इलेक्ट्रॉनिक चलान कम रिटर्न चे प्रमाणपत्र
- पॅन कार्ड लिंक कंपनीचे बँक खाते
- कर्मचाऱ्यांचे आधार लिंक बँक खाते
- कर्मचाऱ्यांचा आधार प्रमाणित युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN)
- पहिल्यांदाच नोकरीवर लागलेल्या कर्मचाऱ्यांसाठी उमंग व्याप वर फेशियल ऑथेंटीकेशन द्वारे नोंदणी चे प्रमाणपत्र
प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेसाठी अर्ज कसा करायचा
प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेसाठी खालील प्रमाणे अर्ज करावा.
- सर्वप्रथम प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार या अधिकृत वेबसाईटवर या.
- इथे आल्यानंतर एम्प्लॉयर लॉगिन वर क्लिक करा.
- आता अर्जदाराला EPFO एम्प्लॉयर पोर्टलवर क्लिक करायचे आहे.
- तिथे क्लिक केल्यानंतर लॉगिन क्रेडिएन्शिअल्स आणि कॅपच्या भरून घ्या.
- आता होमपेजवर परत या. तिथे ‘PMVBRG’ या पर्यायावर क्लिक करा आणि तिथून पार्ट बी रजिस्ट्रेशन वर क्लिक करा.
- आता तुम्हाला एक प्रश्न विचारला जाईल त्यामध्ये तुमची कंपनी जीएसटी एन मध्ये नोंदणीकृत आहे का तुम्ही होय किंवा नाही हा पर्याय निवडा.
कंपनी जी एस टी एन नोंदणी
- जर तुमची कंपनी जी एस टी एन नोंदणीकृत नसेल तर ड्रॉप डाऊन लिस्ट मधून एक कारण निवडा.
आणि जर तुमची कंपनी जी एस टी ए एन नोंदणीकृत असेल तर तुम्हाला सर्व पर्याय आहेत माहिती भरायची आहे म्हणजे जीएसटी ए एन नंबर बँक अकाउंट नंबर बँक आय एस एफ नंबर हे बँक अकाउंट कंपनीच्या पॅन कार्ड ची लिंक असणे आवश्यक आहे जीएसटी आणि बँक खात्याचे व्हेरिफिकेशन संबंधित एजन्सी द्वारे केले जाईल.
अर्ज सबमिट करा
- आता संपूर्ण माहिती भरल्यानंतर अर्जदाराला अंडरटिंग ला स्वीकार करा यावर क्लिक करा आणि सबमिट बटन दाबा.
- त्यानंतर अर्जदाराला वैयक्तिक माहिती व ई साईन या डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट डीएसीद्वारे अप्रोह करून घ्या.
अशाप्रकारे तुमचे रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होईल ती तुम्ही पीडीएफ फॉरमॅटमध्ये डाऊनलोड करून घेऊ शकता.
जर तुम्हाला बँक खाते बदलायचे असेल तर तुम्ही चेंज बँक खाते पर्यावर क्लिक करून नवीन खात्याची माहिती भरून घ्या आणि ई साईन किंवा डी एस सी द्वारे अप्रोह करून घ्या.
अशाप्रकारे स्टेप बाय स्टेप माहिती भरून तुम्ही प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरू शकता अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या ईपीएफ कार्यालयाशी संपर्क करा किंवा तुमच्या जिल्ह्यात दर महिन्याच्या 27 तारखेला भरणाऱ्या निधी आपके निकट कॅम्पवर जाऊन भेट देऊ शकता.
हे पण वाचा
PMUY 3.0 Online Apply: घरबसल्या उज्ज्वला योजनेत गॅस कनेक्शनसाठी असा करा अर्ज
मित्रांनो,
माझे नाव मंगेश आहे. मला सरकारी योजना,शेतकरी योजना,लाडकी बहीण योजना या संबंधित अन्य शासनाच्या योजनांची माहिती देण्याचा पाच वर्षाचा अनुभव आहे. मी शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरून माहिती गोळा करून लेख तयार करतो. त्यामध्ये अधिकृत शासनाची वेबसाईट ची लिंक फॉर्म कसा भरायचा यासंबंधीत संपूर्ण माहिती दिलेली असते त्यामुळे नागरिकांना सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी मदत होते. धन्यवाद