अखेर 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर! Dushkal Taluka Yadi 2026 जाहीर, पाहा संपूर्ण यादी

Dushkal Taluka Yadi 2026 :नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आज अपुरा पाऊस व पावसाच्या अभावामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे कोरडा दुष्काळ जाहीर करावा. अशी मागणी सर्वसामान्य जनतेमार्फत केली जात होती. याच संदर्भात मुख्यमंत्र्यांनी येत्या शनिवार पर्यंत दुष्काळ जारी केला जाईल असे सांगितले होते. याच पार्श्वभूमीवर आज 26 सप्टेंबर 2026 रोजी दुष्काळजन्य परिस्थिती असलेल्या 265 तालुक्यांमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे.

हा दुष्काळ मध्यम व गंभीर स्वरूपाच्या दोन प्रकारांमध्ये विभागलेला आहे. या 265 तालुक्यांमध्ये दुष्काळाच्या सवलती सुरू करण्यात आलेले आहेत. या संदर्भात शासनाने काढलेल्या जीआर नुसार जाहीर करण्यात आले आहे.जीआर मध्ये कोणत्या तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे?या द्वारे काय सवलती मिळणार आहे?याचीच माहिती आज आपण बघणार आहोत.तरी हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचावा.

हे पण वाचा

PM Kisan 24th Installment: 24 वा हप्ता ऑक्टोबरमध्ये की नोव्हेंबरमध्ये? शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती

Dushkal list in maharashtra 2026

राज्यामध्ये जून पासून आजपर्यंत पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे अनेक घटकांवरती आजचा प्रभाव पडलेला आपल्याला दिसून येतो आता सरकारने राज्यातील 265 तालुक्यांना दुष्काळ जाहीर केलेला आहे या 265 तालुक्यांच्या दुष्काळाच्या परिस्थितीचा अहवाल कृषी आयुक्ता मार्फत सादर केला असून या मार्फत आता trigger 1 (प्रथम कळ) या तालुक्यांमध्ये सुरू झाली आहे तेथील पंचनामे संबंधित जिल्हाधिकारी यांनी सुरू करावे असे शासन निर्णयात सांगितले आहे पंचनामे केलेल्या भागातील पिकांची स्थिती दर्शविणारे छायाचित्र व जीपीएस कोऑर्डिनेट करून पीक परिस्थितीचा अहवाल कृषी आयुक्त यांच्यामार्फत शासनाला तात्काळ सादर करावा असे सांगण्यात आलेली आहे.

Trigger-१ मार्फत मिळणाऱ्या सवलती

राज्यातील दुष्काळग्रस्त Trigger-१ (पहिली कळ) २६५ तालुक्यांत लागू करण्यात आलेली आहे. एकूण २६५ तालुक्यांतील दुष्काळग्रस्त भागासाठी राज्य शासनाकडून खालील उपाययोजना व सवलती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

१) जमीन महसूलात सूट

२) पिक कर्जाचे पुनर्गठन

३) शेतीशी निगडीत कर्जाच्या वसूलीस स्थगिती

४) कृषी पंपाच्या चालू विजबिलात सूट (७.५ हॉर्सपावर पर्यंत क्षमतेच्या विजपंपाचे वीज बिल अगोदरच माफ करण्यात आले आहे. त्यावरील वीज पंपांना सदर सूट लागू असेल)

५) शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परिक्षा शुल्कात माफी

६) रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात शिथिलता आणून जास्तीत जास्त कामे सुरु करणे

७) आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर

८) टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतक-यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे
९) शेतीवर आश्रित शेतकरी/मजूर इत्यादी यांना अन्न धान्याची टंचाई होणार नाही याबाबत व्यवस्था उभी करणे

१०) जनावरांना आवश्यक चारा उपलब्ध होईल याची व्यवस्था करणे

११) जलसंधारणाची कामे सुरु करणे

१२) अगोदरच निर्गमित करण्यात आलेले शासन निर्देशाप्रमाणे पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठी पाण्याचे नियोजन करणे.

या 265 तालुक्यांच्या शेतीत नुकसान बाबतची पूर्णपणे माहिती व आकडेवारी आल्यानंतर सरकार नवीन शासन निर्णय काढणार आहे.

Dushkal Taluka Yadi 2026 या तालुक्यांचा होणार समावेश

यामध्ये कोण कोणत्या तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. ते पाहूया ते तालुके खालील प्रमाणे

अ.क्र.जिल्हाप्रथम कळ (Trigger-1) लागू झालेले तालुकेतालुक्यांची संख्या
1ठाणेनिरंक0
2पालघरनिरंक0
3रायगडश्रीवर्धन1
4रत्नागिरीरत्नागिरी, संगमेश्वर, राजापूर3
5सिंधुदुर्गसावंतवाडी, दोडामार्ग, कणकवली, कुडाळ, वैभववाडी, मालवण, देवगड, वेंगुर्ला8

हे पण वाचा

महिला शेतकरी प्रमाणपत्र 2026: अर्ज कसा करायचा? पात्रता, कागदपत्रे आणि संपूर्ण प्रक्रिया

6नाशिकमालेगाव, बागलाण, कळवण, नांदगाव, सुरगणा, इगतपुरी, पेठ, सिन्नर, येवला, देवळा10
7धुळेधुळे, साक्री, सिंदखेडा, शिरपूर4
8जळगावएरंडोल, पारोळा, धरणगाव, चोपडा, पाचोरा, जामनेर, जळगाव, भडगाव, अमळनेर, रावेर, चाळीसगाव, भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर, यावल15
9नंदुरबारअक्कलकुवा, शहादा, नंदूरबार, नवापूर, तळोदा, अक्राणी6
10अहिल्यानगरनगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, नेवासा, राहुरी, संगमनेर, अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता14
11पुणेभोर, वेल्हा, खेड, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर8
12सोलापूरउत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, मोहोळ, माढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मंगळवेढा11
13सांगलीमिरज, आटपाडी, जत, कवठेमहांकाळ4
14सातारासातारा, खटाव, माण, फलटण, खंडाळा, महाबळेश्वर6
15कोल्हापूरपन्हाळा, राधानगरी, गगनबावडा, भुदरगड, आजरा, चंदगड6
16छ. संभाजीनगरछ. संभाजीनगर, कन्नड, सोयगाव, पैठण, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड, फुलंब्री9
17जालनाबदनापूर, घनसावंगी, अंबड, जालना, परतूर, मंठा, भोकरदन, जाफ्राबाद8
18बीडबीड, गेवराई, माजलगाव, केज, आंबेजोगाई, परळी, आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, धारूर, वडवणी11
19लातूरलातूर, औसा, अहमदपूर, निलंगा, उदगीर, चाकूर, रेणापूर, शिरूरअनंतपाळ, देवणी, जळकोट10
20धाराशिवधाराशिव, कळंब, भूम, वाशी, तुळजापूर, लोहारा, परांडा, उमरगा8
21नांदेडनांदेड, बिलोली, कंधार, लोहा, हदगाव, भोकर, देगलूर, किनवट, हिमायतनगर, माहूर, धर्माबाद, उमरी, अर्धापूर, नायगाव14
22परभणीपूर्णा, पालम, परभणी, सोनपेठ, जिंतूर, गंगाखेड, सेलू, मानवत, पाथरी9
23हिंगोलीहिंगोली, औंढा नागनाथ, कळमनुरी, सेनगाव, वसमत5
24बुलढाणाजळगावजामोद, संग्रामपूर, चिखली, देऊळगावराजा, मेहकर, बुलढाणा, शिंदखेडराजा, लोणार, खामगाव, शेगाव, मलकापूर, मोताळा, नांदुरा13
25अमरावतीअमरावती, भातकुली, चांदूर रेल्वे, नांदगाव खं., धामणगाव रेल्वे, अचलपूर, अंजनगावसुर्जी, तिवसा, धारणी, चिखलदरा, वरुड, मोर्शी, चांदूरबाजार, दर्यापूर14
26अकोलाअकोट, अकोला, पातूर, तेल्हारा, मूर्तिजापूर, बाळापूर, बार्शीटाकळी7
27वाशिमवाशीम, रिसोड, मालेगाव, मंगरुळपीर, कारंजा, मानोरा6
28यवतमाळयवतमाळ, बाभुळगाव, कळंब, दारव्हा, दिग्रस, आर्णी, नेर, पुसद, उमरखेड, महागाव, वणी, मारेगाव, झरी जामणी, केळापूर, घाटंजी, राळेगाव16
29वर्धावर्धा, सेलू, देवळी, आर्वी, समुद्रपूर, हिंगणघाट, आष्टी7
30नागपूरनागपूर, कामठी, सावनेर, पारशिवनी, मौदा, भिवापूर, कळमेश्वर, काटोल, रामटेक, हिंगणा, उमरेड, कुही, नरखेड, नागपूर शहर14
31भंडाराभंडारा, पवनी, लाखांदूर3
32गोंदियातिरोडा1
33चंद्रपूरचंद्रपूर, भद्रावती, गोंडपिंपरी, राजुरा, कोरपना, मूल, वरोरा, सावली, चिमूर, नागभीड, सिंदेवाही, पोंभुर्णा12
34गडचिरोलीगडचिरोली, चामोर्शी7

हे जे 265 तालुके आहेत.तेथील गंभीर स्वरूपाचे महसूल मंडळ जे असतील त्यांच्याद्वारे पिकांची आकडेवारी काढली जाणार आहे. व त्यानंतर पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई चे वितरण करण्यात येणार आहे. अशी माहिती अहवाल मिळाल्यानंतर सरकार द्वारे काढण्यात येणार आहे.तर अशा प्रकारे आज आपण शासन निर्णय मधील सवलती व तालुक्यांचा समावेश या संदर्भातील माहिती बघितलेली आहे.

हे पण वाचा

Leave a Comment