मतदानासाठी तुमच्या ऑफिसने कामगारांना सुट्टी न दिल्यास इथे तक्रार करा
उद्योग, उर्जा व कामगार विभागाअंतर्गत पुणे जिल्ह्यात येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने व ठुकान मालक, व्यवस्थापनांनी कार्यरत अधिकारी व कर्मचान्यांना लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या निवडणूकीमध्ये मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी येत्या 7 व 13 मे रोजी भरपगारी सुट्टी द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी पुणे यांनी दिले आहेत.
सर्व आस्थापना, कारखाने व दुकाने उदा. खाजगी कंपन्यामधीत आस्थापना, दुकाने व इतर आस्थापना, निवासी इंटित, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना, माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, खरेदी केंद्रे, मॉल्स, किरकोळ विक्रेते आदी ठिकाणी कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांनी भरपगारी सुट्टी देण्यात यावी आणि अगदी अपवादात्मक स्थितीत पूर्ण दिवस शक्य नसल्यास दोन-तीन तासांची मुभा देण्यात यावी. सवलत देण्यापूर्वी संबंधित महानगरपालिका अथवा जिल्हाधिकारी यांची पूर्वपरवानगी घ्यावी. याबाबत उद्योग, उर्जा व कामगार विभागाकडील शासन परिपत्रकातील निर्देशाचे तंतोतंत पालन होईल, याबाबत दक्षता घ्यावी.
संबंधित आस्थापनेतील अधिकारी कर्मचारीकारांच्याकडून मतदानाकरीता भरपगारी सुट्टी अथवा सवलत न मिळाल्याची तक्रार कामगार कार्यालयास प्राप्त झाल्यास संबंधित आस्थापनेविरुद्ध भारत निवडणूक आयोग तसेच शासनाने विहित केलेल्या नियमानुसार कारवाई करण्यात येईल, याची नोद घ्यावी.
1. आचार संहिता म्हणजे नेमकं काय? 2. आचार संहितेमध्ये काय चालते आणि काय चालत नाही ?
3. नेमक्या कोणत्या इमानदार आणि कडक शिस्तीच्या अधिकाऱ्यामुळे राजकारण्यांना शिस्त लावणारी आचार संहिता सुरु झाली ?
4. आचार संहिताचे उल्लंघन केल्यास काय होतं ? अश्या अनेक प्रश्न आपल्याला पडले असतील तर एकदम सोप्या शब्दात खालील माहिती नक्की वाचा.
आचार संहिता म्हणजे नेमकं काय?
निवडणूकीच्या दिवशी मतदानासाठी भर पगारी सुट्टी न दिल्यास संबंधितांनी अपर कामगार आयुक्त यांचे कार्यालय, पुणे विभाग, कामगार उप आयुक्त यांचे कार्यालय, पुणे जिल्हा adcipune5@gmail.com किंवा dycipune2021@gmail.com या ई-मेल पत्त्यावर असे आवाहन अपर कामगार आयुक्त मौतेंद्र पोळ यांनी केले आहे.
महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात मतदानासाठी भर पगारी सुट्टी न दिल्यास संबंधित मा. जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करू शकतात. आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांचा ई-मेल address पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
महाराष्ट्रातील जिल्हे व जिल्हाधिकारी यांचे ई-मेल
तुम्हाला जर आम्ही दिलेली माहिती मनापासून आवडली असेल आणि अशीच सोप्या शब्दात नवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या WhatsApp किंवा Telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
आपल्याला कधी आपल्या सोबत ऑनलाईन फसवणूक झाली, गोंधळात काय करावे ते कळत नाही, नकळत आपण त्यात वाहवत जातो, त्यातच जर आर्थिक फसवणूक झाली असेल तर सुरुवातीचे 30 ते 45 मिनिटं पैसे परत मिळण्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाची असतात, अशा वेळी घरी बसूनच झालेल्या फसवणुकीची तक्रार लगेच पोलिसांकडे कशी करायची, या विषयीची विस्तृत माहिती या पोर्टल वर दिलेली आहे. वाचा आणि सेव्ह करून ठेवाच.
घरबसल्या Cyber Crime Complaint ऑनलाईन कशी करायची?
तुमचा हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल घरबसल्या कसा शोधायचा? जाणून घ्यायला इथे क्लिक करा
तळटीप-
कायदेविषयक माहिती आणि मार्गदर्शनासाठी संपर्क करा-
Adv. Ajit Shinde (MA LLB),
Mobile Number- 9860451777
One of the best informative website.
Thanks for informing public.
Thanks from – we the people of india