तुमचा हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल कसा शोधायचा?
How to Find Lost Phone | How to Find Stolen Phone | Find My Lost Phone

अनेकवेळा आपला मोबाईल हरवला जातो किंवा चोरीला जातो. परंतु तो परत कसा मिळवायचा याची माहिती आपल्याला नसते. पोलीस स्टेशन मध्ये आपण गेलो तर बऱ्याच वेळा आपली तक्रार घेतली जात नाही किबहुना आपल्याला पोलीस स्टेशनला जायचे नसते. अशा वेळी आपण घरी बसूनच आपला मोबाईल कुठे आहे, कोणत्या एरिया मध्ये आहे ते पाहू शकता. मोबाईल चोरीला गेलेला असेल आणि तो अजूनही चालू असेल किंवा रिंग जात असेल तर चोर कुठे आहे ते आपण घरी बसूनच पाहू शकता आणि त्याप्रमाणे कारवाई करू शकता. इथे सांगितलेल्या पद्धतीनुसार आपण चोराचे किंवा मोबाईलचे अचूक लोकेशन शोधू शकता. ते कसे यासाठी खालील स्टेप्स फोलो करा.

तुम्हाला जर पोलीस स्टेशनला न जाता तुमच्या हरवलेल्या फोन ची पोलिसांना तक्रार करायची असेल तर Report Lost Phone इथे क्लिक करा.

How to Find Lost Phone | Lost Phone Tracker
Find My Lost Phone

१) How to Find Lost Phone : सर्वप्रथम प्रत्येक मोबाईलमध्ये आपण मोबाईल नवीन घेतल्या घेतल्या गुगल अकाऊंटने लॉगीन केलेले असते. त्यामुळे आपण गुगलची मदत घेऊन तो मोबाईल शोधू शकतो. गुगलने आपल्याला Find Your Phone नावाचं एक फिचर दिलेलं आहे. Trace mobile number exact location on map  तुम्हाला काय करायचा आहे की तुमच्या कोणत्याही मित्राचा फोन घेऊन Find Your Phone  इथे क्लिक करा. जर शक्य असेल तर हरवलेला मोबाईल सोडून अजून दुसऱ्या कोणत्या फोन किंवा laptop मध्ये तुमचा ईमेल लॉगीन आधीच असेल तर त्यावरून वरच्या Find Your Phone वर क्लिक करा.
(त्यासाठी हा लेख मोबाईलमध्ये किंवा इतर लोकांना पाठूवून ठेवा किंवा आमचा WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा, त्यावर आपल्या सर्व लेखांची लिंक असते)

२) वर Find Your Phone वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली दिलेल्याप्रमाणे गुगलची वेबसाईट दिसेल.

how to find lost phone
how to find lost phone

 

३) ही विंडो उघड्ल्यानंतर त्यामध्ये SIGN IN TO START या पर्यायावर क्लिक करा. व आपला ईमेल किंवा मोबाईल क्रमांक टाकून Next वर क्लिक करा. नंतर तुमच्या ईमेल चा पासवर्ड टाकून Sign In करा. जर तुम्ही आधीच लॉगीन असलेल्या मोबाईल वरून क्लिक केलेले असेल तर मग तुम्हाला डायरेक्ट पुढची स्टेप दिसेल.

४) आता तुम्हाला तुमचा फोन नेमका कुठे आहे याचं एकदम अचूक लोकेशन Map वर दिसू लागेल. How to find lost phone

how to find lost phone which is switched off

५) इथे तुम्हाला तुमच्या फोनची कंपनी, तो कोणत्या नेटवर्क ला किंवा Wifi ला कनेक्ट आहे त्याच नाव पण दिसेल.

६) तुम्हाला तुमच्या फोनचा IMEI क्रमांकही इथून पाहता येईल, यासाठी तुम्ही तिथेच डावीकडील उजव्या कोपऱ्यात असणाऱ्या सेटिंग बटन वर क्लिक करू शकता. How to find IMEI number of lost phone

७) यामध्ये तुम्हाला खालील काही पर्याय पण दिलेले असतील जेणेकरून चोराला तुमची माहिती वापरता येणार नाही.

   अ) तुमच्या फोन ची रिंग वाजवा.  (हे करण्यासाठी तिथल्या Play Sound वर क्लिक करा.)

   ब) तुमचा फोन लॉक करा. (हे करण्यासाठी तिथल्या Secure device वर क्लिक करा.)

  क) तुमच्या फोन मधील सर्व माहिती मिटवून टाका. (हे करण्यासाठी तिथल्या Factory reset device वर क्लिक करा.)

 

 हे ही वाचा : जर तुमची ऑनलाईन फसवणूक झाली असेल तर त्याची घरी बसल्या पोलिसांकडे ऑनलाईन तक्रार कशी करायची ते जाणून घेण्यासाठी
How to Report Cyber Crime Online
 यावर क्लिक करा.

 

अशाच एकदम सोप्या भाषेत लिहिलेल्या आमच्या नवीन पोस्ट्स विषयी आपल्याला माहित होण्यासाठी आमचा WhatsApp किंवा Telegram ग्रुप जॉईन करा.

योजना मराठी WhatsApp ग्रुप जॉईन करा  किंवा    योजना मराठी Telegram ग्रुप जॉईन करा

 

1 thought on “How to Find Lost Phone | How to Find Stolen Phone | हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल कसा शोधायचा?”

Leave a Comment

सायबर भामट्यांपासून सावधान राहा. Cyber Crime Complaint in 2 Minutes यामी गौतमचा Article 370 हा काश्मीर वरील सिनेमा पहाच महाराष्ट्र शासनात फोरेन्सिक तज्ञ म्हणून काम करण्याची संधी तुमचा हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल असा शोधा आपण कोणीही असा, किमान एवढे आर्थिक नियोजन कराच