Chief Minister Ladki Bahin Yojana : रक्षाबंधनापूर्वीच मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्रातील महिलांना रक्षाबंधन भेट दिली जात आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर सावध झालेल्या राज्यातील महायुती सरकारने आगामी विधानसभा निवडणुकीतील विजयासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात गरीब महिलांसाठी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना राबवण्याच्या हालचाली सुरू आहेत. याअंतर्गत गरीब महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहेत.
Ladki Bahin Yojana : आगामी विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी महायुती सरकारने कंबर कसली आहे. त्यासाठी समाजातील विविध घटकांसाठी नव्या आकर्षक योजना आणण्याची तयारी सुरू आहे. विशेषत: महिला आणि तरुणांच्या मतपेढीवर डोळा ठेवून त्यांना खूश करण्यासाठी दोन मोठ्या योजनांची आखणी सुरू आहे. राज्यातील महिलांची मने आणि मते जिंकण्यासाठी मध्य प्रदेशच्या धर्तीवर राज्यात ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना राबविण्याचे नियोजन आहे. या योजनेबाबत माहिती घेण्यासाठी सरकारने अधिकाऱ्यांचे एक पथक अलीकडेच मध्य प्रदेशला पाठविले होते.
हेही वाचा: महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ केव्हा मिळणार ? किती वाढेल DA आणि HRA ?
या पथकाने योजनेचा अभ्यास केल्यानंतर त्याआधारे ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना तयार करण्याचे काम प्रगतिपथावर असल्याचे समजते. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात याची घोषणा केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कशी असेल ?
१) महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी घेतानाच गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे, असे या योजनेचे उद्दिष्ट असेल.
२) पहिल्या टप्प्यात दारिद्र्यरेषेखालील महिलांना महिन्याला १५०० रुपये मिळणार.
३) या योजनेसाठी दारिद्र्यरेषेखालील २१ ते ६० वयोगटातील कुटुंबातील एक अविवाहित महिला, विवाहित महिला, विधवा, परितक्त्या व घटोस्फोटीत महिला यांचा समावेश असेल.
४) रक्कम प्रत्येक महिन्याला लाभार्थी महिलांच्या थेट बँक खात्यात जमा होणार.
हेही वाचा : चुकीच्या खात्यावर फोनपे झालेले पैसे असे परत मिळवा.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पात्रता
(१) लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी हवी.
(२) राज्यातील विवाहित, परितक्त्या, घटस्फोटीत, विधवा महिला, कुटुंबातील एक अविवाहित महिला.
(३) किमान वयाची 21 वषे पूर्ण व कमाल वयाची 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत.
(४) सदर योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थी महिलेचे बँक खाते असणे आवश्यक.
(५) लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.2.50 लाखापेक्षा जास्त नसावे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कोण पात्र नाही
१) ज्यांच्या कुटुंबातील एखादा सदस्य आयकर भरत असेल.
२) ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे २.५० / अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असेल.
३) इतरही काही अटी-शर्ती आहेत.
हेही वाचा : चेक बाऊन्स झाल्यास काय करावे? तुमची फसवणूक होण्याआधीच या गोष्टी लक्षात घ्या.
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे प्रारूप
गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ‘मुख्यमंत्री लाडली बहना’ ही योजना आणली. त्या निवडणुकीत सर्व अंदाज खोटे ठरवत भाजपने राज्यात पुन्हा बहुमत मिळविले. अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही या लोकप्रिय योजनेमुळे मध्य प्रदेशने २९ पैकी २९ जागा भाजपच्या पारड्यात टाकल्या. या दोन्ही विजयांमागे ‘लाडली बहना योजना‘ कळीची ठरल्याचे मानले जाते. आता हेच प्रारूप राज्यात राबविण्याची तयारी शिंदे सरकारने केली आहे.
हेही वाचा : पुण्याच्या या लव्हस्टोरीतून झालेल्या खुनाने अख्या भारताला हादरून सोडलं होतं. पूर्ण वाचा
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा ?
राज्य सरकारने नुकतेच नारीशक्ती दूत नावाचे Application लौंच केले आहे. या द्वारे महिला घरबसल्या या योजनेसाठी अर्ज करू शकतात. त्याद्वारे अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या खालील स्टेप्स मध्ये-
१) सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमधील Play Store मधून Narishakti Doot Application हे डाउनलोड करा.
२) मग तुमचा मोबाईल क्रमांक टाका. त्यानंतर तुमच्या मोबाईल वर एक JM-MAHGOV या नावाच्या मेसेज ने OTP येईल तो तिथे टाका.
३) त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वर क्लिक करा.
४) त्यानंतर अर्ज करणाऱ्या महिलेची सर्व माहिती जसे की आधारकार्ड वरील पूर्ण नाव, वडील किंवा पतीचे नाव, लग्नापूर्वीचे नाव, जिल्हा, गाव, बँकेचा अकाऊंट नाव व क्रमांक, IFSC क्रमांक (पासबुक वर असतो) वगैरे माहिती भरा.
५) त्यानंतर आधार कार्ड, डोमिसाईल प्रमाणपत्र किंवा शाळेचा दाखला, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड, महिलेचे हमीपत्र, बँक पासबुक व महिलेचा पासपोर्ट फोटो अपलोड करा.
६) आणि Accept च्या चौकोनात टिक करून माहिती जतन करा यावर क्लिक करा.
७) तुमचा अर्ज अशाप्रकारे भरला गेला आहे,
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ऑफलाईन अर्ज कसा करायचा
अ) अर्ज करण्याची प्रक्रिया – योजनेचे अर्ज पोर्टल / मोबाइल ॲपद्वारे /सेतू सुविधा केंद्रकडून (महा-ई-सेवा केंद्र ) ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे:-
१) ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल, त्याच्यासाठी “अर्ज” भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात / बाल विकास प्रकल्प अधिकारी कायालये
(नागरी/ग्रामीण/आदिवासी) /ग्रामपंचायत/वार्ड/सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील.
(२) वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात/ बाल विकास प्रकल्प अधिकारी कायालये (नागरी/ग्रामीण/आदिवासी) /सेतू सुविधा केंद्र मध्ये कार्मचार्याद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी पोच पावती दिली जाईल.
(३) अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल.
(४) अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी हजर राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा फोटो काढता येईल आणि E-KYC करता येईल. यासाठी महिलेने खालील कागदपत्र आणणे आवश्यक आहे.
1. कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र (रेशनकार्ड)
2. स्वतःचे आधार कार्ड
खूप महत्वाचे: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्याची सुरुवात १ जुलै पासून केली जाईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट असेल. फॉर्म कधीही भरला तरी पैसे जुलै महिन्यापासूनच मिळतील. आणि सर्वात पहिला हफ्ता १४ ऑगस्ट रोजी बँकेत जमा होईल.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
1. कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र (रेशनकार्ड)
2. स्वतःचे आधार कार्ड
3. रहिवाशी दाखला किंवा मतदार कार्ड किंवा शाळा सोडल्याचा दाखला / प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला
4. बँक पासबुक
5. पासपोर्ट फोटो
6. वय दाखला (PanCard, १०वी दाखला वगैरे ज्यावर जन्मतारीख आहे)
7. २.५ लाख उत्पन्न दाखला नसेल तर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड चालेल.
1. आचार संहिता म्हणजे नेमकं काय?
2. आचार संहितेमध्ये काय चालते आणि काय चालत नाही ?
3. नेमक्या कोणत्या इमानदार आणि कडक शिस्तीच्या अधिकाऱ्यामुळे राजकारण्यांना शिस्त लावणारी आचार संहिता सुरु झाली ?
4. आचार संहिताचे उल्लंघन केल्यास काय होतं ?
असे अनेक प्रश्न आपल्याला पडले असतील तर एकदम सोप्या शब्दात ही माहिती नक्की वाचा.
ही योजना अंमलात आल्यानंतर या योजनेसाठी अर्ज कसा करायचा ही माहिती याच ठिकाणी टाकली जाईल. ते अपडेट मिळविण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा.
आपण जर शेतकरी, गृहिणी, बेरोजगार, शासकीय – निमशासकीय कर्मचारी, शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी, इतर पात्र कर्मचारी, तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक किंवा असाल तर WhatsApp किंवा Telegram ग्रुपमध्ये सामिल व्हा!