पुण्याच्या या लव्हस्टोरीतून झालेल्या खुनाने अख्या भारताला हादरून सोडलं होतं..

उदित भारती केस: या अनोख्या प्रेम कहाणीची सुरुवात तेव्हा झाली जेव्हा अदिती आणि उदित जम्मूला अभियांत्रिकी शिक्षणासाठी एकत्र होते. इंजिनियरिंग च्या पहिल्या वर्षात दोघांची ओळख झाली आणि ते एकमेकाच्या प्रेमात पडले. अभियांत्रिकी झाल्याबर त्यांनी एकत्र वाकड पुणे येथील एका नामवंत कॉलेजात MBA ला प्रवेश घेतला होता. MBA पूर्ण होताच ते दोघे लग्न करणार होते, दोघांच्या घरच्यांचाही या गोष्टीला पाठींबा मिळाला. पण नशिबाने त्यांच्या भाळी काही वेगळेच लिहिले होते.

MBA चे शिक्षण घेत असताना अदिती आपल्याच वर्गातील जयपूरच्या प्रवीण नावाच्या एका तरुणाला भेटली आणि त्याच्या प्रेमात पडली. तिला आता उदित नकोसा होऊ लागला होता. तिला उदित सोबतचे नाते संपवायचे होते. आणि उदित मात्र या भोळ्या समज घेऊन होता की त्याचे अदिती सोबत लग्न होईल. पण उदित ला प्रकरण माहित झाल्यावर मात्र तो खूप चिडला व त्याने त्याच्या घरच्यांना या गोष्टींची कल्पना दिली. अदिती च्या घरच्यांनीही तिला खूप समजावले पण तिने ते मानले नाही. उदितच्या घरच्यांनी त्याला सगळे काही विसरून जायला सांगून अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला सांगितले.

MBA चालू असतानाच प्रवीणला गुडगाव मध्ये नोकरी मिळाली व तो आदितीसोबत गुडगावमध्ये राहायला गेला. दोघांनी तिथे कोणालाही न सांगता लग्न केलं. या सर्व गोष्टींचा अदितीला guilt होता की उदित तिच्या मागे अजूनही सिरीयस असल्याचे तिला आवडत नव्हते देव जाणे. तिने आणि प्रवीण ने एक कारस्थान रचलं.


इथे क्लिक करा.

 

उदित भारती केस: एक दिवस अदितीने उदितला पुण्याला येणार असल्याचे कळवले आणि त्याला कॅफे मध्ये भेटायला बोलवले. ते दोघे चिंचवड मधील Mac D ला भेटले. नेहमीप्रमाणे अदिती गप्पा मारत असताना त्याला म्हणाली की ती महाराष्ट्रातील एका प्रसिद्ध देवाच्या दर्शनासाठी पुण्याला आली असून त्याचा प्रसाद तिने उदित ला खायला दिला.

प्रसाद खाल्ल्यानंतर घरी परतल्यानंतर लगेचच उदितला उलट्यांचा आणि जुलाब याचा त्रास होऊ लागल्याने पिंपरी चिंचवड मधील थेरगाव येथील एका रुग्णालयात नेण्यात आले. उदितचा दुसऱ्या दिवशी तिथेच त्या हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. पोलिसांनीही आकस्मिक मृत्यूची नोंद घेऊन प्रोसेस उरकली.

इथपर्यंत तर सर्वकाही सरळ सरळ वाटत होते. पण सर्वांत मोठा झटका तेव्हा बसला जेव्हा उदितच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये अर्सेनिक (Arsenic) या विषारी मूलद्रव्याचा ट्रेस आढळून आला आणि चौकशी सुरु झाली. 


 हेही वाचा : आपल्याला कधी आपल्या सोबत ऑनलाईन फसवणूक झाली, गोंधळात काय करावे ते कळत नाही, नकळत आपण त्यात वाहवत जातो, त्यातच जर आर्थिक फसवणूक झाली असेल तर सुरुवातीचे 30 ते 45 मिनिटं पैसे परत मिळण्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाची असतात, अशा वेळी घरी बसूनच झालेल्या फसवणुकीची तक्रार लगेच पोलिसांकडे कशी करायची, या विषयीची विस्तृत माहिती या पोर्टल वर दिलेली आहे. वाचा आणि सेव्ह करून ठेवाच.
घरबसल्या Cyber Crime Complaint ऑनलाईन कशी करायची?


पोलिसांनी सखोल तपास केल्यानंतर त्यांना अदिती आणि उदित यांच्या जुन्या प्रेमसंबंधाविषयी माहिती मिळाली. तसेच ज्या दिवशी उदितचा मृत्यू झाला त्यादिवशी अदिती आणि उदित भेटले होते हेही उदितच्या मित्रांकडून समजलं. अदिती त्याला हॉस्पिटलमध्येही भेटायलाही आली होती. उदितच्या मित्रांनी अदितीला उदितने सांगितल्याप्रमाणे प्रसादाबद्दल विचारले असता अदितीने तो प्रसाद उदितने खाल्ला आणि तिनेही खाल्ला असे सांगितले होते. पण मित्रांनी डॉक्टरांना दाखविण्यासाठी तो प्रसाद अदितीला मागितला असता तिने तो फेकून दिल्याचं सांगितलं. तेवढ्यात अदिती काहीतरी तिच्या पर्समधून काढत असताना अदितीच्या पर्स मध्ये प्रसाद असलेले Packet पाहिलं आणि ते तिच्याकडून घेऊन डॉक्टरांना दिलं होतं. नंतर अदिती तिथून निघून गेल्यावर उदितचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी नंतर दिल्लीला जावून त्यावेळेस अदितीची ज्या बॅगेत प्रसाद आणला होता ती बॅग फोरेन्सिक लॅबला पाठविण्यात आली. फोरेन्सिक लॅबच्या अहवालामध्ये त्या बॅगेत अर्सेनिक चे ट्रेस आढळून आले.

इथपर्यंतही उदितला आदितीनेच मारले आहे हे  कोर्टात सिद्ध होऊ शकत नव्हते. म्हणून कोर्टाच्या आदेशानुसार अदितीची मुंबई येथील कालिना येथे असणाऱ्या फोरेन्सिक लॅब मध्ये BEOS चाचणी घेण्यात आली. भारतात प्रथमतः च ही चाचणी अस्तित्वात आल्यापासून एका गुन्ह्यातील आरोपीवर घेतली गेली. आणि या चाचणीत अदिती पकडली गेली. या चाचणीच्या निष्कर्षात अदितीने उदितला प्रसादामधून अर्सेनिक दिल्याचे सिद्ध झाले. फोरेन्सिक विभागाने पुन्हा एकदा आपली निपुणता आणि कौशल्य इथे सिद्ध केले.


हेही वाचा : चुकीच्या खात्यावर फोनपे किंवा गुगलपे झालेले पैसे इथे तक्रार करून असे परत मिळवा.


आता ही BEOS टेस्ट म्हणजे काय तर Brain Electrical Oscillation Signature Profiling. ही एक वैज्ञानिक चाचणी असून ज्यामध्ये काही प्रमाणात संवेदनशीलता आहे आणि चौकशीची एक न्यूरो-सायकॉलॉजिकल पद्धत आहे ज्याला ‘ब्रेन फिंगरप्रिंटिंग’ असेही संबोधले जाते BEOS प्रोफाइलिंग दरम्यान, आरोपीला तोंडी उत्तरे न देण्यास सांगितले जाते; त्याच्या मेंदूतून अनुभवात्मक ज्ञान मिळवले जाते. अनुभवात्मक ज्ञान एखाद्या कार्यक्रमात सहभागी होण्याद्वारेच प्राप्त केले जाते, ज्यामुळे व्यक्तीला त्या क्रियाकलापाचा अनुभव घेता येतो. आरोपी खरोखरच गुन्हा करण्यात गुंतलेला होता की त्याला फक्त त्याची माहिती मिळाली होती हे या चाचणीद्वारे कळते. हे घटनांच्या पुनर्रचनामध्ये (Scene Recreation) मदत करते. Pune Crime

udit bharti case
BEOS Test

अशा वेगळ्याच प्रकाराने झालेल्या Cold Blooded मर्डरने अख्या भारतातील जनतेला हादरून सोडलं.  सिनेमात दाखवतात गुप्तहेर संघटना जसा एखाद्याचा काटा काढतात त्याचप्रमाणे किंवा त्याहूनही कुशलतेने एखादी मुलगी अशाप्रकारे थंड डोक्याने आपल्या Ex-प्रियकराचा काटा काढू शकते, असा विचारही त्यावेळेस (२००७-०८ चे वर्ष) कोणी केला नसेल.

त्यावेळेस उदितच्या कुटुंबियाच्या बाजूने अतिरिक्त सरकारी वकील नीलिमा वर्तक यांनी खटला चालवला तर बचाव पक्षाचे वकील विजयराव मोहिते यांनी अदिती आणि प्रवीणची बाजू मांडली व किमान शिक्षेची मागणी केली.

तत्कालीन अतिरिक्त सत्र न्यायाधीश शालिनी फणसाळकर-जोशी यांनी आदिती शर्मा आणि तिचा प्रियकर प्रवीण खंडेलवाल यांना उदित भारती याला विष मिसळून ‘प्रसाद’ देऊन खून केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या निकालाच्या १०० पानांपैकी ९० पाने न्यायाधीश शालिनी फणसाळकर-जोशी यांनी BEOS चाचणी का ग्राह्य धरण्यात आली आणि अदितीचं खुनामागचं motive कसंसिद्ध होतं हे सांगितले आहे. तर अशाप्रकारे सिनेमालाही लाजवेल अशा खुनाच्या पद्धतीला पोलीस, फोरेन्सिक तज्ञ आणि न्यायाधीश महोदयांनी उघडे पाडले. पुण्यातील हा गुन्हा उघड झाल्यानंतर संपूर्ण भारताचे या खटल्याने लक्ष वेधले होते.

 

तुम्हाला जर आम्ही दिलेली माहिती मनापासून आवडली असेल आणि अशीच सोप्या शब्दात नवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या WhatsApp किंवा Telegram ग्रुप ला जॉईन व्हा.

Yojana Marathi Telegram Group

Yojana Marathi Instagram

 

Leave a Comment

सायबर भामट्यांपासून सावधान राहा. Cyber Crime Complaint in 2 Minutes यामी गौतमचा Article 370 हा काश्मीर वरील सिनेमा पहाच महाराष्ट्र शासनात फोरेन्सिक तज्ञ म्हणून काम करण्याची संधी तुमचा हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल असा शोधा आपण कोणीही असा, किमान एवढे आर्थिक नियोजन कराच