शेयर मार्केट आज का पडले ? Why Share Market Crashed Today ?

Share market crashed today : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना शेअर बाजारात प्रचंड मोठी घसरण झाली आहे. सेन्सेक्स तब्बल 5400 अंकांनी कोसळला आहे. निफ्टीनेही १५०० अंकांची मोठी घसरण नोंदवली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीतील ही घसरण आतापर्यंतची उच्चांकी आहे. यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे.


इथे क्लिक करा.


लोकसभा निवडणुकीत भाजपा आघाडीला अपेक्षेपेक्षा फारच कमी जागा मिळत असल्याचे समोर आल्यानंतर शेअर बाजारातील घसरण तीव्र झाली. बाजारात हाहाकार माजला. ही घसरण वाढत जाऊन सेन्सेक्स तब्बल 5440 अंकांनी आपटला. बँक निफ्टीमध्ये 7 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. बँक ऑफ बडोदा आणि पीएनबीचे शेअर्स 20 टक्क्यांनी घसरले आहेत. एसबीआयमध्ये 15 टक्के घसरण झाली आहे. बंधन बँक आणि इंडसइंड बँकेच्या समभागांना 10 टक्के तोटा सहन करावा लागत आहे.


हेही वाचा : आपल्याला कधी आपल्या सोबत ऑनलाईन फसवणूक झाली, गोंधळात काय करावे ते कळत नाही, नकळत आपण त्यात वाहवत जातो, त्यातच जर आर्थिक फसवणूक झाली असेल तर सुरुवातीचे 30 ते 45 मिनिटं पैसे परत मिळण्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाची असतात, अशा वेळी घरी बसूनच झालेल्या फसवणुकीची तक्रार लगेच पोलिसांकडे कशी करायची, या विषयीची विस्तृत माहिती या पोर्टल वर दिलेली आहे. वाचा आणि सेव्ह करून ठेवाच.
घरबसल्या Cyber Crime Complaint ऑनलाईन कशी करायची?


शेअर बाजारात विक्रीचा दबाव वाढतच आहे. सेन्सेक्स 71,508 वर पोहोचला. तर निफ्टी 1400 अंकांनी घसरून 21,871 वर आहे. पीएसयू बँक समभाग 15 टक्के आणि मेटल समभाग 10 टक्क्यांनी घसरले आहेत. या प्रचंड घसरणीतही हिंदुस्थान युनिलिव्हर, ब्रिटानिया, सिप्ला, सन फार्मा, नेस्ले इंडियाचे शेअर्स वधारले आहेत. हिंदुस्थान युनिलिव्हरच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 4 टक्क्यांची वाढ दिसून येत आहे.

शेअर बाजारातील व्यवहारादरम्यान अदानी समूहाचे समभाग 18 टक्क्यांनी घसरले. त्यामुळे समूह कंपन्यांना एकूण 10 लाख कोटी रुपयांचे मार्केट कॅपचे नुकसान सहन करावे लागले. मुकेश अंबानींच्या रिलायन्समध्येही विक्री सुरू आहे. भारतीय एअरटेलचे समभाग 7 टक्के, टाटा मोटर्सचे 5 टक्के, आयसीआयसीआय बँक 6 टक्के, मारुती 2 टक्के आणि आयटीसी 3 टक्क्यांहून अधिक घसरले. शेअर बाजारातील विक्रमी घसरणीमुळे कंपन्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. आजच्या व्यवहारादरम्यान, BSE वर सूचीबद्ध सर्व कंपन्यांचे बाजार भांडवल 21.5 लाख कोटी रुपयांनी घसरून 404.42 लाख कोटी रुपये झाले आहे.

 

 

शेयर मार्केट पडण्याची खालील काही मुख्य कारणे-

पहिले कारण- एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरले नाहीत.

दुसरे कारण- भाजपकडे पूर्ण बहुमत नाही

तिसरे कारण- परदेशी गुंतवणूकदारांची उदासीनता

चौथे कारण- गुंतवणूकदारांची भावना बिघडली (भाजपला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने आणि विदेशी गुंतवणूकदारांच्या उदासीनतेमुळे शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांच्या भावनेवर विपरीत परिणाम झाला आहे)


हेही वाचा : चुकीच्या खात्यावर फोनपे किंवा गुगलपे झालेले पैसे इथे तक्रार करून असे परत मिळवा.


मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांनी काय करावे:

मोठ्यात मोठ्या कंपनीचे शेयर तुम्हाला १५ ते २५% पडलेले दिसले असतील तर ते Long Term साठी विकत घ्यायला हरकत नसेल कारण शेयर मार्केट हे जास्त करून Event बेस वर पडले आहे. मोठ्यात मोठ्या कंपन्या या १२+ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीत प्रगती करणारच असतात.

याउलट तुम्हाला जास्त रिस्क नसेल घ्यायची तर तुम्ही Mutual Fund मध्ये गुंतवणूक करू शकता. कारण यामध्येही Mutual Fund  मधील युनिट्स ची किंमत कमी झालेली असते व जास्त युनिट्स आपल्याला मिळू शकतात.


हेही वाचा : पुण्याच्या या लव्हस्टोरीतून झालेल्या खुनाने अख्या भारताला हादरून सोडलं होतं.


तुम्हाला जर आम्ही दिलेली माहिती मनापासून आवडली असेल आणि अशीच सोप्या शब्दात नवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या WhatsApp किंवा Telegram ग्रुप ला जॉईन व्हा.

Yojana Marathi Telegram Group

Yojana Marathi Instagram

 

Leave a Comment

सायबर भामट्यांपासून सावधान राहा. Cyber Crime Complaint in 2 Minutes यामी गौतमचा Article 370 हा काश्मीर वरील सिनेमा पहाच महाराष्ट्र शासनात फोरेन्सिक तज्ञ म्हणून काम करण्याची संधी तुमचा हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल असा शोधा आपण कोणीही असा, किमान एवढे आर्थिक नियोजन कराच