T20 World Cup 2024 India Squad आणि काय असणार भारतीय टीमची रणनीती ?

Team India T20 World Cup 2024: टीम इंडिया साखळी फेरीत एकूण 4 सामने खेळणार आहे. मात्र त्याआधी टीम इंडियाचा एकमेव सराव सामना होणार आहे.आयपीएलच्या 17 व्या हंगामानंतर क्रिकेट चाहत्यांना टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेचे वेध लागले आहेत. एकूण २० संघ सहभागी होणार आहेत. 20 संघांनी आपल्या खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत.

टीम इंडिया रोहित शर्मा याच्या नेतृत्वात वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणार आहे. तर हार्दिक पंड्या याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे. टीम इंडियाचे खेळाडू हे 2 तुकड्यांमध्ये अमेरिकेत पोहचणार आहे. त्यापैकी पहिली तुकडी आधीच पोहचली आहे. टीम इंडिया आपला एकमेव सराव सामना हा शनिवारी 1 जून रोजी खेळणार आहे. त्यानंतर 2 जूननंतर मुख्य स्पर्धेचा श्रीगणेशा होईल.


इथे क्लिक करा.

टीम इंडियाचा एकमेव सराव सामना हा बांगलादेश विरुद्ध होणार आहे. सराव सामन्यांना सोमवार 27 मे पासून सुरुवात झाली आहे. पहिला सामना हा नेपाळ विरुद्ध कॅनेडा यांच्यात पार पडला. मुख्य स्पर्धेआधी खेळाडूंना इथल्या परिस्थितीची माहिती होईल. त्यामुळे सराव सामना फार महत्त्वपूर्ण असणार आहे. टीम इंडियाच्या पहिल्या तुकडीतील खेळाडूंनी सरावाला सुरुवात केली आहे. तर दुसऱ्या तुकडीतील खेळाडू पोहचल्यानंतर संपूर्ण ताकदीने सराव केला जाईल.

टीम इंडियाचा सराव सामना तिथेच होणार जिथे पाकिस्तान विरुद्ध महामुकाबला आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी हा सराव सामना फार महत्त्वाचा असणार आहे. india vs pakistan t20 world cup 2024.


 हेही वाचा : आपल्याला कधी आपल्या सोबत ऑनलाईन फसवणूक झाली, गोंधळात काय करावे ते कळत नाही, नकळत आपण त्यात वाहवत जातो, त्यातच जर आर्थिक फसवणूक झाली असेल तर सुरुवातीचे 30 ते 45 मिनिटं पैसे परत मिळण्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाची असतात, अशा वेळी घरी बसूनच झालेल्या फसवणुकीची तक्रार लगेच पोलिसांकडे कशी करायची, या विषयीची विस्तृत माहिती या पोर्टल वर दिलेली आहे. वाचा आणि सेव्ह करून ठेवाच.
घरबसल्या Cyber Crime Complaint ऑनलाईन कशी करायची?


 

T20 World Cup 2024 India Squad

T20 world cup 2024 team list : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

राखीव खेळाडू : शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद आणि आवेश खान


हेही वाचा : चुकीच्या खात्यावर फोनपे किंवा गुगलपे झालेले पैसे इथे तक्रार करून असे परत मिळवा.


T20 World Cup 2024 Schedule :

T20 World Cup 2024 चे वेळापत्रक खाली दिलेल्या प्रमाणे असेल.

T20 World Cup 2024 Schedule
T20 World Cup 2024 Schedule

 


हेही वाचा : पुण्याच्या या लव्हस्टोरीतून झालेल्या खुनाने अख्या भारताला हादरून सोडलं होतं.


शब्दांकन आणि माहिती: 
श्रीपाद पुंडे
Email- shripadpunde17@gmail.com

तुम्हाला जर आम्ही दिलेली माहिती मनापासून आवडली असेल आणि अशीच सोप्या शब्दात नवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या WhatsApp किंवा Telegram ग्रुप ला जॉईन व्हा.

Yojana Marathi Telegram Group

Yojana Marathi Instagram

Leave a Comment

सायबर भामट्यांपासून सावधान राहा. Cyber Crime Complaint in 2 Minutes यामी गौतमचा Article 370 हा काश्मीर वरील सिनेमा पहाच महाराष्ट्र शासनात फोरेन्सिक तज्ञ म्हणून काम करण्याची संधी तुमचा हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल असा शोधा आपण कोणीही असा, किमान एवढे आर्थिक नियोजन कराच