महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ केव्हा मिळणार ? किती वाढेल DA, समोर आली मोठी अपडेट

राज्य सरकारी कर्मचारी महागाई भत्ता महाराष्ट्र: तुम्ही महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत आहात का, महाराष्ट्र राज्यात सरकारी कर्मचारी म्हणून काम पाहत असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे तुमच्या महागाई भत्ता वाढी संदर्भात, जसं की आपणास ठाऊकच आहे की लोकसभेच्या निवडणुकांसाठी आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी केंद्रातील मोदी सरकारने एक मास्टरस्ट्रोक लगावला आहे.


1. आचार संहिता म्हणजे नेमकं काय?
2. आचार संहितेमध्ये काय चालते आणि काय चालत नाही ?
3. नेमक्या कोणत्या इमानदार आणि कडक शिस्तीच्या अधिकाऱ्यामुळे राजकारण्यांना शिस्त लावणारी आचार संहिता सुरु झाली ?
4. आचार संहिताचे उल्लंघन केल्यास काय होतं ?
असे अनेक प्रश्न आपल्याला पडले असतील तर एकदम सोप्या शब्दात ही माहिती नक्की वाचा.


केंद्रीय कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी त्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला. आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना 46% एवढा महागाई भत्ता दिला जातो. यामध्ये मात्र जानेवारी 2024 पासून 4% वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

म्हणजे महागाई भत्ता ज्याला डीए असं म्हणतात तो आता 50 टक्के एवढा झाला आहे. याचा रोख लाभ मात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याच्या वेतनासोबत अर्थातच जे वेतन एप्रिल महिन्यात त्यांच्या हातात येईल त्या वेतना सोबत दिला गेला.

हा वाढलेला भत्ता जानेवारी महिन्यापासून लागू करण्यात आला असल्याने सदर सरकारी नोकरदार मंडळीला जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील केंद्र शासनाच्या माध्यमातून दिला गेला.

दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढ लागू झाल्यानंतर अनेक राज्य सरकारांनी तेथील राज्य कर्मचाऱ्यांसाठी देखील डीए वाढीचा निर्णय घेतलेला आहे. उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश, मध्य प्रदेश येथील राज्य सरकारने त्यांच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला आहे.

 


आपल्याला कधी आपल्या सोबत ऑनलाईन फसवणूक झाली, गोंधळात काय करावे ते कळत नाही, नकळत आपण त्यात वाहवत जातो, त्यातच जर आर्थिक फसवणूक झाली असेल तर सुरुवातीचे 30 ते 45 मिनिटं पैसे परत मिळण्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाची असतात, अशा वेळी घरी बसूनच झालेल्या फसवणुकीची तक्रार लगेच पोलिसांकडे कशी करायची, या विषयीची विस्तृत माहिती या पोर्टल वर दिलेली आहे. वाचा आणि सेव्ह करून ठेवाच.

घरबसल्या Cyber Crime Complaint ऑनलाईन कशी करायची?


महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांना केव्हा मिळणार DA वाढीचा लाभ

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50 टक्के झाला आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील 50% होणे अपेक्षित आहे.

खरंतर राज्य कर्मचाऱ्यांना आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच या बाबतचा निर्णय वर्तमान शिंदे-फडणवीस-पवार सरकार घेणार अशी आशा होती. परंतु राज्य सरकारने हा निर्णय घेणे टाळले आहे.

तथापि, केंद्र शासनाच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्यात कार्यरत असलेल्या अखिल भारतीय सेवेतील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने आचार संहिता लागू होण्यापूर्वीच जाहीर केला आहे.

Maharashtra government da : याशिवाय राज्यातील मुंबई महानगरपालिकेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील यावेळी राज्य कर्मचाऱ्यांच्या आधीच वाढवण्यात आला आहे. बीएमसी मध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 50 टक्के करण्यात आला आहे. जानेवारी 2024 पासून त्यांना वाढीव महागाई भत्ताचा लाभ मिळणार आहे.

यामुळे आता निवडणुका संपन्न झाल्यानंतर आणि निकाल जाहीर झाल्यानंतर म्हणजे आचार संहिता संपल्यानंतर लोकसभा स्थापन झाल्यावरच महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना तथा पेन्शनधारकांना महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जाईल तसेच या बाबीचा प्रस्ताव तयार असून आचारसंहिता संपल्यावर तो लगेच मांडला जाईल, अशी शासकीय कर्मचारी वर्तुळात चर्चा होती.

वाढीव 4 टक्के महागाई भत्ताचा लाभ हा राज्यातील कर्मचाऱ्यांना पुढील महिन्यांमध्ये जुलैमध्ये प्राप्त होईल, दिनांक 27 जुन पासून राज्याचे पावसाळी अधिवेशास सुरुवात होत असून , या अधिवेशनांमध्ये कर्मचाऱ्यांच्या विविध मागणींचा विचार केला जाणार असून , यांमध्ये 50 टक्के प्रमाणे डी.ए वाढीचा निर्णय झाला आज दिनांक १०/०७/२०२४ रोजी शासन निर्णय निर्गमित झाला .


हेही वाचा : चुकीच्या खात्यावर फोनपे झालेले पैसे असे परत मिळवा.


हेही वाचा : तुमचा हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल घरबसल्या कसा शोधायचा?  जाणून घ्यायला इथे क्लिक करा.


DA 50% झाला तर HRA किती वाढेल ? 

7 व्या वेतन आयोगाने शिफारस केली आहे की जेव्हा डीए 50% पर्यंत पोहोचेल तेव्हा एचआरएचे दर अनुक्रमे X, Y आणि Z शहरांमध्ये मूळ वेतनाच्या 30%, 20% आणि 10% पर्यंत सुधारित केले जावे. सद्यस्थितीत HRA 27%, 18% आणि 9% एवढा मिळतो. ( म्हणजे एकंदरीत ३%, २% आणि १% ने वाढेल.)


हेही वाचा : पुण्याच्या या लव्हस्टोरीतून झालेल्या खुनाने अख्या भारताला हादरून सोडलं होतं..


तुम्हाला जर आम्ही दिलेली माहिती मनापासून आवडली असेल आणि अशीच सोप्या शब्दात नवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या WhatsApp किंवा Telegram ग्रुप ला जॉईन व्हा.

Yojana Marathi WhatsApp Group

Yojana Marathi Telegram Group

Yojana Marathi Instagram

 

 

1 thought on “महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ केव्हा मिळणार ? किती वाढेल DA, समोर आली मोठी अपडेट”

Leave a Comment

सायबर भामट्यांपासून सावधान राहा. Cyber Crime Complaint in 2 Minutes यामी गौतमचा Article 370 हा काश्मीर वरील सिनेमा पहाच महाराष्ट्र शासनात फोरेन्सिक तज्ञ म्हणून काम करण्याची संधी तुमचा हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल असा शोधा आपण कोणीही असा, किमान एवढे आर्थिक नियोजन कराच