राज्यातील प्रशासन सांभाळण्यासाठी जे महत्वाचे अधिकारी उदा. उपजिल्हाधिकारी (Deputy Collector), तहसीलदार , उप मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस उपाधीक्षक ( Dy.SP) असतात त्यांची निवड ही MPSC च्या राज्यसेवा स्पर्धा परीक्षेतून होते. तसेच PSI, STI, ASO म्हणजेच पोलीस उपनिरीक्षक ही Class 2 ची अराजपत्रित पदे दुय्यम सेवा ( Combined Exam) परीक्षेमार्फत भरली जातात.
MPSC राज्यसेवा परीक्षा 3 टप्यात घेतली जाते, हे आपणा सर्वांना माहित आहेच.
पहिला टप्पा — पूर्व परीक्षा MPSC Prelims (400 marks)
GS- 200 Marks यातील मार्क्सवर पूर्वपरीक्षेचे मेरीट लागते.
Csat- 200 Marks (Qualifying Marks) यामध्ये तुहाला फक्त 66 मार्क्स मिळवून पात्र व्हायचे असते.
दुसरा टप्पा — मुख्य परीक्षा Mains (800 marks)
तिसरा टप्पा – Interveiw (100 marks)
यातील मुख्य परीक्षेचे आणि मुलाखतीचे गुण अंतिम यादीसाठी विचारात घेतले जातात.
राज्यसेवा Prelims चे महत्व –
पूर्व परीक्षेचे गुण अंतिम यादीत ग्राह्य नसतात फक्त मुख्य परीक्षेला पात्र होण्यासाठी पूर्व परीक्षेचे महत्व आहे. बरीचशी हुशार मुले ही पूर्व परीक्षा (mpsc prelims) उत्तीर्ण करू शकत नाहीत आणि परिणामी ती पद मिळण्यापासून वंचित राहतात.
यातील कोणत्याही पुर्व परीक्षाचा अभ्यास करताना खालील काही पुस्तके आपण वाचलेलीच असायला हवी किंबहुना सर्वप्रथम तुम्ही खाली दिलेली स्टेट बोर्ड ची पुस्तके वाचा आणि नंतरच मोठी पुस्तके वाचायला घ्या. कारण MPSC ला पेपर सेट करण्यासाठी हा शासकीय मान्यता असलेल्याच पुस्तकांचा संदर्भच घ्यावा लागतो. आपण इतर सर्व मोठी पुस्तके वाचून या बेसिक पुस्तकांकडेच दुर्लक्ष करतो आणि परीक्षेत सोप्या प्रश्नांचे मार्क्स गमावून prelims नापास होतो.
१) इतिहास – ६ वी, ७ वी, ८ वी, ९वी , ११ वी
२) भूगोल – ६ वी, ७ वी, ८ वी, ९ वी, १० वी, ११ वी, १२ वी (नवनीत चा Atlas सोबत घेऊनच या भूगोल वाचावा)
३) विज्ञान – ६ वी, ७ वी, ८ वी, ९ वी, १० वी,
४) अर्थशास्त्र – ११ वी, १२ वी
५) राज्यशास्त्र – ११ वी, १२ वी
६) यानंतर मागील वर्षी विचारलेले पूर्व परीक्षेचे प्रश्न पाहावेत.
वरील पुस्तके ही सर्वात आधी वाचावीत. यानंतरच मुख्य मोठी पुस्तके वाचावयास घ्यावी. (तुम्हाला आमचे नेमकी कोणती पुस्तके वाचावीत, अभ्यास कसा करावा यांचे विनामूल्य मार्गदर्शन हवे असल्यास आम्हाला ग्रुप admin ला मेसेज करा किंवा खाली कमेंट करा.
तुम्हाला सोप्या शब्दात आणि एकदम समजेल अश्या पद्धतीने कसा अभ्यास करावा आणि कोणती लिमिटेड पुस्तके वाचावीत याचे विनामूल्य मार्गदर्शन हवे असेल तर तशी comment इथे करा आणि आमच्या WhatsApp किंवा Telegram Group जॉईन व्हा.
तुम्हाला जर आम्ही दिलेली माहिती मनापासून आवडली असेल आणि अशीच सोप्या शब्दात नवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या WhatsApp किंवा Telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
Very interesting details you have mentioned, appreciate it for posting.Raise your business