Namo Shetkari Yojana | Namo Shetkari Sanman Yojana
Namo Shetkari Yojana Maharashtra | नमो शेतकरी योजना  

नमो शेतकरी योजना : भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. देशातील बहुतांश नागरिकांचा शेती हा एक पारंपरिक व्यवसाय आहे त्यामुळे केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार देशातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी वेळोवेळी विविध योजनांची सुरुवात करत असते. केंद्र सरकारनं शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. त्यापाठोपाठ आता  महाराष्ट्र सरकारनं देखील अशाच एक योजनेची सुरुवात केली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना (Namo Shetkari Maha Sanman Nidhi Yojana) असं या योजनेचं नाव आहे.

नमो शेतकरी सन्मान योजना चा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. शेतकऱ्याकडे स्वतःची शेतजमीन असणे आवश्यक आहे. अर्जदार शेतकऱ्याकडे स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक आहे. अर्जदार शेतकऱ्याचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक आहे.


हेही वाचा : चुकीच्या खात्यावर फोनपे झालेले पैसे असे परत मिळवा.


Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana
Namo Shetkari Samman Nidhi Yojana

महाराष्ट्र शासनाने नुकत्याच शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजना अंतर्गत वर्षाला ६००० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे आता शेतकऱ्यांना वर्षाला एकूण १२००० रुपये अनुदान मिळेल.

जर का तुम्ही प्रधान मंत्री किसान सम्मान निधी योजनेचा लाभ घेत असाल तर आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजना महाराष्ट्र शासनाद्वारे सुरु करण्यात आली आहे यात योजनेत सुद्धा तुम्हाला वार्षिक एकूण ६००० रुपये अनुदान मिळतील.

प्रधान मंत्री सम्मान निधी योजना हि केंद्र शासनाच्या माध्यमातून चालवली जात आहे आता महाराष्ट्र शासनाद्वारे ही योजना राबवण्यात येणार आहे . या योजने अंतर्गत सुद्धा वार्षिक ६००० रुपये शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. केंद्र शासनाद्वारे ६००० रुपये तसेच राज्य शासनाद्वारे ६००० एकूण १२००० रुपये शेतकऱ्यांना दिले जाणार आहे.


हेही वाचा : पुण्याच्या या लव्हस्टोरीतून झालेल्या खुनाने अख्या भारताला हादरून सोडलं होतं.


Namo Shetkari Yojana Eligibility | नमो शेतकरी योजनेची पात्रता काय?
नमो शेतकरी सन्मान योजना | नमो शेतकरी योजना स्टेटस

  • फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकरीच या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • अर्जदार हा शेतकरी असणे आवश्यक आहे.
  • या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करावा
  • शेतकऱ्याकडे स्वतःची शेतजमीन असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार शेतकऱ्याकडे स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार शेतकऱ्याचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक आहे.
  • या योजनेचा लाभ फक्त शेतकऱ्यांनाच दिला जाईल.
  • शासकीय सेवेत काम करत असलेल्या व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

 हेही वाचा : तुमचा हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल घरबसल्या कसा शोधायचा?  जाणून घ्यायला इथे क्लिक करा.


नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पात्रता निकष

नमो शेतकरी योजनासाठी पात्र होण्यासाठी शेतकरी पूर्ण करू शकतील अशी पात्रता निकष खाली दिले आहेत

  • अर्जदाराचे क्षेत्रफळ, अल्पभूधारक आणि त्यांच्या नावावर २ हेक्टरपेक्षा कमी जमीन असावी.
  • लाभार्थी शेतकऱ्याचे पती-पत्नीही या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत.
  • शेतकरी ग्रा.पं. सदस्य, खासदार, आमदार किंवा पी.एस. सदस्य लाभार्थी शेतकरी आयकर भरणारा नसावा, अन्यथा ते या योजनेसाठी पात्र नाहीत.
  • लाभार्थी शेतकरी हे सरकारी कर्मचारी नसावेत.
  • 2019 पूर्वी ज्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीन आहे ते या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत.



 हेही वाचा : आपल्याला कधी आपल्या सोबत ऑनलाईन फसवणूक झाली, गोंधळात काय करावे ते कळत नाही, नकळत आपण त्यात वाहवत जातो, त्यातच जर आर्थिक फसवणूक झाली असेल तर सुरुवातीचे 30 ते 45 मिनिटं पैसे परत मिळण्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाची असतात, अशा वेळी घरी बसूनच झालेल्या फसवणुकीची तक्रार लगेच पोलिसांकडे कशी करायची, या विषयीची विस्तृत माहिती या पोर्टल वर दिलेली आहे. वाचा आणि सेव्ह करून ठेवाच.
घरबसल्या Cyber Crime Complaint ऑनलाईन कशी करायची?


नमो शेतकरी योजना कागदपत्रे | आवश्यक कागदपत्रे 

  1. आधार कार्ड
  2. रेशन कार्ड
  3. रहिवाशी दाखला
  4. मोबाईल नंबर
  5. ई-मेल आयडी
  6. उत्पन्नाचा दाखला
  7. बँक खात्याचा तपशील
  8. जमिनीचे कागदपत्रे 7/12 व 8अ
  9. पासपोर्ट आकाराचे फोटो

नमो शेतकरी सन्मान निधी योजना | Namo Shetkari Sanman Yojana अंतर्गत ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत

  1.  अर्जदार शेतकऱ्याला सर्वात प्रथम आपल्या जिल्हा कार्यालयात कृषी विभागात जावे लागेल.
  2. कृषी विभागातून नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
  3. अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत योग्य ती कागदपत्रे जमा करावी लागतील व सदर अर्ज जमा करावा लागेल.

अशा प्रकारे तुमची नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल


भारतीय पोलीस सेवेतील तडफदार मराठी अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांचे नवीन भाषण पहा


नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत

 

namo shetkari yojana

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत स्वत:ची नोंदणी करण्यासाठी व्यक्ती खालील नोंदणी प्रक्रिया करू शकतात.

  1. प्रथम, तुम्ही या योजनेच्या वेबसाइटला भेट द्या: https://nsmny.mahait.org/
  2. वेबसाइटवर, तुम्ही “ग्रामीण शेतकरी नोंदणी” या पर्यायावर टॅप करा. हा पर्याय दिसत नसेल तर वरील प्रमाणे ऑफलाईन अर्ज करावा किंवा जवळच्या महा ई- सेवा केंद्रात संपर्क साधावा.
  3. आता, तुमचा आधार क्रमांक एंटर करा आणि तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डशी लिंक आहे याची खात्री करा.
  4. त्यानंतर, तुमचे राज्य निवडा. तुमचे राज्य निवडल्यानंतर, तुमच्या मोबाइल नंबरवर पाठवलेला OTP एंटर करा आणि पुढे जा.
  5. आता तुमच्या समोर एक फॉर्म दिसेल, ज्यामध्ये तुम्ही जिल्हा, तालुका गाव निवडा.
  6. त्यानंतर, तुम्ही तुमचा जमीन नोंदणी आयडी प्रविष्ट केला पाहिजे.
  7. तुम्ही शिधापत्रिका क्रमांक फॉर्ममध्ये भरावा. यानंतर, तुम्ही तुमच्या जमिनीशी संबंधित तपशील, क्षेत्र खाते क्रमांक इत्यादी भरा.
  8. आता, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमिट बटणावर टॅप करा.

अशा प्रकारे तुमची नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.


आपण कोणीही असा गरीबश्रीमंत किंवा मध्यमवर्गीय कमीत कमी एवढे आर्थिक नियोजन (Arthik Niyojan) करायलाच हवे.
पूर्ण वाचा


नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची स्थिती कशी तपासायची

 

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत पेमेंट लाभ मिळवू इच्छिणाऱ्या सर्व पात्र शेतकऱ्यांनी स्वतःची साइटवर नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यांनी नोंदणी केल्यानंतर आणि या योजनेसाठी अर्ज केल्यानंतर, हप्त्याची स्थिती कशी पहावी हे खाली सांगितले आहे –

namo shetkari yojana beneficiary Status

  1. सर्वप्रथम, शेतकऱ्यांनी योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. https://nsmny.mahait.org/
  2. एकदा वेबसाइटचे मुख्यपृष्ठ दिसल्यानंतर, नमो शेतकरी हप्ता स्थिती टॅबवर टॅप करा.
  3. शेतकऱ्यांची श्रेणी निवडा, मग ती ग्रामीण असो की शहरी. आवश्यक माहिती भरा आणि Get OTP पर्यायावर टॅप करा.
  4. तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर OTP मिळेल. OTP बॉक्समध्ये तुमचा OTP एंटर करा आणि सबमिट पर्यायावर टॅप करा.
  5. संपूर्ण लाभार्थ्यांची यादी तुमच्या समोर दाखवली आहे. या यादीत तुमचे नाव तपासा, आणि तुमच्या हप्त्याच्या नावाची स्थिती जाणून घ्या.

नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता कधी येणार

नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता कधी येणार असा प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांना पडलेला असेल, तर आपल्यासाठी एक खुशखबर आहे या योजनेचा पुढचा हफ्ता हा मार्च अखेर किंवा एप्रिल महिन्यात आपल्या खात्यावर जमा होईल.

 

आपण जर शेतकरी, गृहिणी, बेरोजगार, शासकीय – निमशासकीय कर्मचारी,  शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी, इतर पात्र कर्मचारी, तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक किंवा असाल तर WhatsApp  किंवा Telegram ग्रुपमध्ये सामिल व्हा!

योजना मराठी WhatsApp ग्रुप

Yojana Marathi Telegram Group

Yojana Marathi Instagram

 

Leave a Comment

सायबर भामट्यांपासून सावधान राहा. Cyber Crime Complaint in 2 Minutes यामी गौतमचा Article 370 हा काश्मीर वरील सिनेमा पहाच महाराष्ट्र शासनात फोरेन्सिक तज्ञ म्हणून काम करण्याची संधी तुमचा हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल असा शोधा आपण कोणीही असा, किमान एवढे आर्थिक नियोजन कराच