चेक बाऊन्स झाल्यास काय करावे? तुमची फसवणूक होण्याआधीच या गोष्टी लक्षात घ्या.

चेक बाऊन्स झाल्याची माहिती चेक देणाऱ्यास देणे बंधनकारक आहे. जर चेक स्विकारणाऱ्याला एका महिन्याच्या आत पेमेंट मिळाले नाही, तर अशा परिस्थितीत चेक देणाऱ्यास कायदेशीर नोटीस पाठविली जाते. नोटीस मिळाल्यानंतर, नोटीस मिळाल्याच्या दिवसापासून 15 दिवसांच्या आत त्याने पैसे भरले नाहीत, तर तो कायद्यानुसार दंडनीय गुन्हा आहे. चेक बाऊन्सची शिक्षा ही दोन वर्षांपेक्षा जास्त नसलेल्या मुदतीची कारावास किंवा चेकच्या दुप्पट रकमेपर्यंत वाढू शकेल असा दंड किंवा दोन्ही . धनादेशाची रक्कम भरण्यासाठी ड्रॉवर विरुद्ध दिवाणी खटला देखील दाखल केला जाऊ शकतो.

हेही वाचा : तुमचा हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल घरबसल्या कसा शोधायचा?  जाणून घ्यायला इथे क्लिक करा.

धनादेश न वटणे (Cheque Bounce) व त्याच्याशी संबंधित कायदेशीर बाबी 

दैनंदिन जीवनात खाजगी असो अथवा व्यावसायिक कामाशी संबंधित व्यवहार करताना बर्‍याच वेळा लोक एकमेकांना धनादेश (चेक) देतात. धनादेश देणाऱ्याने जेवढ्या रकमेचा धनादेश दिला आहे ती रक्कम जर त्या व्यक्तीच्या खात्यात असेल तर तो धनादेश वटला जातो आणि जर धनादेश देणार्‍याने त्यावर टाकलेली रक्कम त्या व्यक्तीच्या खात्यात तेवढी रक्कम नसेल तर तो धनादेश वाटत नाही.

ज्या वेळी धनादेश वटत नाही त्यावेळी ज्या बँक शाखेत धनादेश जमा केला ती बँक त्या व्यक्तीस चेक रिटर्न मेमो देते. त्यात कोणत्या कारणाने तो धनादेश वटला नाही याचा तपशील दिलेला असतो.

  हेही वाचा : आपल्याला कधी आपल्या सोबत ऑनलाईन फसवणूक झाली, गोंधळात काय करावे ते कळत नाही, नकळत आपण त्यात वाहवत जातो, त्यातच जर आर्थिक फसवणूक झाली असेल तर सुरुवातीचे 30 ते 45 मिनिटं पैसे परत मिळण्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाची असतात, अशा वेळी घरी बसूनच झालेल्या फसवणुकीची तक्रार लगेच पोलिसांकडे कशी करायची, या विषयीची विस्तृत माहिती या पोर्टल वर दिलेली आहे. वाचा आणि सेव्ह करून ठेवाच.

घरबसल्या Cyber Crime Complaint ऑनलाईन कशी करायची?

कोणत्याही व्यक्तीला चेक देताना घ्यायची काळजी:

१. शक्य असेल त्याठिकाणी ऑनलाईन व्यवहार करावा  जर काही कारणामुळे शक्य नसेल तर जेवढी रक्कम समोरील व्यक्तीस द्यायची आहे ती रक्कम टाकून तसेच त्यादिवशीची तारीख टाकूनच धनादेश द्यावा.

२. कोरा(ब्लॅंक) चेक देणे टाळावे.

३. जर धनादेशावर टाकेलली रक्कम खात्यात नसेल तर त्याची माहिती समोरील व्यक्तीस आधीच द्यावी व त्याला कोणत्या दिवशी तो चेक टाकल्यावर वटेल ह्याची कल्पना द्यावी.

हेही वाचा :  चुकीच्या खात्यावर फोनपे झालेले पैसे असे परत मिळवा.

 

धनादेश वटला नाही तर काय करावे?

जर एखाद्या व्यक्तीने तुम्हाला धनादेश (चेक) दिला व तुम्ही तो बँकेत वटण्यासाठी  जमा केल्यानंतर, तो धनादेश देणार्‍यच्या खात्यात अपुरी रक्कम अथवा इतर कारणांनी वटला नाही असे बँकेने तुम्हाला कळविते. ती माहिती मिळाल्यानंतर महिन्या भरच्या आत तुम्ही धनादेश देणार्‍या व्यक्तीस तुम्हाला देय रक्कम देण्यासंबंधी वकिलामार्फत डिमांड नोटिस महिन्याभराच्या आत पाठविणे आवश्यक असते.

चेक बाऊंस प्रकरणाच्या संबंधित लिमीटेशन कायद्याचे काटेकोर पालन करणे गरजेचे असते. त्यामुळे तुम्हाला कोणी दिलेला चेक बाऊंस झाला तर त्याला वेळेत डिमांड नोटीस पाठवणे गरजेचे असते तसेच तुम्ही दिलेला चेक बाऊंस झाला असेल आणि त्यासंबंधित डिमांड नोटीस तुम्हाला आली असेल तर त्याचे कायदेशीर वकिलामार्फत उत्तर देणे फायद्याचे ठरते.

Negotiable Instruments Act of 1881 कायद्याच्या कलम १३८ नुसार संबंधितावर न्यायालयात तक्रार दाखल केली जाऊ शकते. अशा प्रकरणात दोषी आढळल्यास संबंधित व्यक्तीला चेकवरील रकमेच्या दुप्पट रक्कम दंड स्वरुपात द्यावी लागू शकते किंवा २ वर्षांच्या कारावासाची तरतूद आहे. कायदेशीर तक्रार दाखल करण्यासाठी चेक बाऊन्स झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत कायदेशीर नोटीस द्यावी लागते. जर ड्रॉवरने नोटीस कालावधीत पैसे दिले नाहीत, तर तुम्ही निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायद्याच्या कलम 138 अंतर्गत योग्य न्यायालयासमोर फौजदारी तक्रार दाखल करू शकता. सामान्यतः, हे मॅजिस्ट्रेट न्यायालय असेल ज्याच्या अधिकारक्षेत्रात ज्या बँकेची शाखा आहे जेथे पैसे देणाऱ्याचे खाते आहे.

कायदेविषयक माहिती व मार्गदर्शनासाठी संपर्क:
अ‍ॅड.अद्वैत देशपांडे BE (EnTC), LLB
+91 9503308395

 

नुकताच यामी गौतम, प्रियमनी आणि वैभव तत्ववादी यांचा Article 370 हा सिनेमा प्रदर्शित झाला, आणि पुन्हा एकदा साऱ्या देशाचं लक्ष काश्मीर खोऱ्याकडे ओढलं गेलं, राज्यघटनेतील आर्टिकल 370 मुळे तिथे माजलेली अराजकता भारताच्या कपाळावरील एक भळभळती जखम होऊन बसली होती, 2019 मध्ये नरेंद्र मोदी सरकारने कशाप्रकारे हे आर्टिकल 370 काढून भारताला अविभाज्य केलं, याची साहसी कथा या movie मध्ये दाखवण्यात आली आहे. आर्टिकल 370 नेमके काय होते, कशामुळे ते देशाच्या कपाळावरील जखम होऊन बसलं होतं, ते खाली दिलेल्या लिंक मध्ये मुद्देसूदपणे वाचा आणि समजून घ्या.

कलम ३७० नेमकं काय होतं?  काय होता नेमकं त्याचा मागचा इतिहास?  जाणून घ्यायला इथे क्लिक करा.

1. आचार संहिता म्हणजे नेमकं काय?
2. आचार संहितेमध्ये काय चालते आणि काय चालत नाही ?
3. नेमक्या कोणत्या इमानदार आणि कडक शिस्तीच्या अधिकाऱ्यामुळे राजकारण्यांना शिस्त लावणारी आचार संहिता सुरु झाली ?
4. आचार संहिताचे उल्लंघन केल्यास काय होतं ?
असे अनेक प्रश्न आपल्याला पडले असतील तर एकदम सोप्या शब्दात ही माहिती नक्की वाचा.

 

 

 

तुम्हाला जर आम्ही दिलेली माहिती मनापासून आवडली असेल आणि अशीच सोप्या शब्दात नवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या WhatsApp किंवा Telegram ग्रुप ला जॉईन व्हा.

Leave a Comment

सायबर भामट्यांपासून सावधान राहा. Cyber Crime Complaint in 2 Minutes यामी गौतमचा Article 370 हा काश्मीर वरील सिनेमा पहाच महाराष्ट्र शासनात फोरेन्सिक तज्ञ म्हणून काम करण्याची संधी तुमचा हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल असा शोधा आपण कोणीही असा, किमान एवढे आर्थिक नियोजन कराच