आपण कोणीही असा गरीब, श्रीमंत किंवा मध्यमवर्गीय कमीत कमी एवढे आर्थिक नियोजन (Arthik Niyojan) करायलाच हवे !!!

आज प्रत्येक व्यक्तीची मग तो तुमच्या माझ्यासारखा सामान्य व्यक्ती असो किंवा मुकेश अंबानी प्रत्येकाला काही ना काही आर्थिक ध्येय आहेत. आज एखादा महिन्याला ५० हजार रुपये कमवत असेल तर २५००० जर त्याला महिन्याला घर खर्चाला लागत असतील तर उरलेली रक्कम बचत आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून पुढील भविष्यातील गरजांसाठी​, अडचणीच्या काळातील खर्चासाठी बाजूला ठेवणे अनिवार्य आहे. आर्थिक नियोजन म्हणजेच आपल्या भविष्यातील खर्चाचा अंदाज घेणे आणि त्याची तरतूद करणे. आज वाढलेली महागाई, शिक्षण आणि औषध पाण्याचा वाढलेला खर्च त्यामुळे भविष्याबद्दल कमालीची भीती निर्माण झालेली दिसते. या सर्वातून मार्ग काढण्यासाठी “आर्थिक नियोजन” करून घेणे हाच पर्याय उभा राहतो. arthik niyojan kya hai

आपण अनेक ठिकाणी आर्थिक नियोजन कसे करावे, आर्थिक नियोजनाच्या विविध किचकट अश्या गोष्टी ऐकत असतो वाचत असतो. पण त्या वाचल्या किंवा तसे करायला गेले की आपल्याकडून त्याचे पालन होत नाही किंवा ते असं आहे की नवीन वर्षांचा संकल्प फक्त पहिला आठवडा चालतो तसं काही दिवसच आर्थिक नियोजन होतं आणि जीवनाच्या धावपळीत ते पुन्हा जैसे थे होऊन बसतं. आज आम्ही तुम्हाला अंमलात आणायला खूप सोपं आणि आपल्याला पाळता येईल एवढंच आर्थिक नियोजन कसं करायचा हे सांगणार आहोत.

arthik niyojan
arthik niyojan

 

चला तर मग पाहुया आर्थिक नियोजन कसे करावे ते. सर्वप्रथम हा लेख वाचणाऱ्या लोकांना खालील काही कॅटेगरी मध्ये आपण विभागू शकतो.

१) नुकतीच नौकरी लागलेली किंवा धंदा सुरु केलेली पण अद्याप लग्न न झालेली तरुणाई (मुले आणि मुली)
२) जॉब / नोकरी करणारी किंवा धंदा सुरु केलेली आणि नुकतेच १ ते ३ वर्ष लग्नाला झालेली तरुणाई
३) कमी / मध्यम / उच्च पगार किंवा नफा मिळवणारे आणि लहान मुले असणारे प्रौढ
४) ज्यांची मुले मोठी असून आता कामातून निवृत्ती स्वीकारणार असलेले अनुभवी प्रौढ

 

वरील कॅटेगरी क्रमांक १ ते ३ साठी आधी आम्ही नियोजनाच्या काही सोप्या आणि बेसिक स्टेप्स सांगणार आहोत आणि त्या का गरजेच्या आहेत तेही लगेच पुढे लिहिनर आहोत.

१) आर्थिक नियोजन पहिली स्टेप  | Arthik Niyojan STEP- I

Term Insurance / जीवन विमा योजना माहिती / टर्म इंश्योरेंस

कॅटेगरी १ व २ मधील लोक नुकतीच कमवायला लागली आहेत. ही लोकं सध्या आपल्या आयुष्याचा सर्वात सुंदर अश्या टप्प्यावर आहे कि जिथे काहीही जबाबदारी नाही. हाती पैसा येत असल्यामुळे यांना आपल्या लहानपणासून पाहिलेली स्वप्न किंवा आवडी-निवडी पूर्ण करण्याचं स्वातंत्र्य मिळालेल असतं. आणि ते खूप मनोसोक्त enjoy करतही असतात. या ठिकाणी विचार करण्याच्या गोष्टी अशा आहेत की तुम्ही तुम्हाला आयुष्याच्या या टप्प्यावर आण्यासाठी तुमच्या कुटुंबातील सदस्यांनी जसे कि आई, वडील, भाऊ, बहिण, पत्नी इत्यादी यापैकी सर्व किंवा काहींनी आपल्या आवडीनिवडी बाजूला ठेवल्या असतील, प्रसंगी त्यांना कधी एखादी गोष्ट मिळाली नसेल पण तुमच्या शिक्षणाच्या किंवा Struggle च्या काळात तुम्हाला गरज असणारी गोष्ट मिळवून दिली असेल, अशा लोकांशी तुमचे मतभेदही  झाले असतील परंतु ते प्रत्येक कुटुंबात साहजिकच असतं. पण तुम्ही त्यांच्यावर मनापासून प्रेम करता पण कधी बोलून दाखवत नाहीत. कॅटेगरी क्रमाक ३  च्या लोकांसाठी यांच्या जागी त्यांची मुले, पत्नी तसेच वृद्ध आई-वडील असतील.

आता विचार करा की जर एखाद्या वाईट प्रसंगी तुमचं  काही बरं वाईट झाले किंवा तुम्हाला एखाद्या अपघातात मोठं अपंगत्व आलं (असं कधीच होऊ नये हीच आई भवानी चरणी प्रार्थना) तर या लोकांच काय होईल? एक तर आयुष्यभर तुमच्यासाठी या लोकांनी त्याग केलेला असतो आता निवृत्तीच्या वयात त्यांना आधार हवा असताना अशी भयंकर वेळ आली तर काय? मुलांच्या शिक्षणाच कसं होईल? त्यांना आर्थिक आधार कोणाचा राहील?

विचार करूनच कसतरी झालं ना? याच साठी आपल्याला कमवायला लागल्या लागल्या सर्वप्रथम Term Insurance घ्यायलाच हवा. माणूस स्वताला कितीही कष्ट झाले तरी सहन करतो परंतु आपल्या प्रियजनांना झालेल्या साध्या यातनाही तो खपवून घेत नाही. म्हणून Term Insurance (टर्म इंश्योरेंस) अतिमहत्वाचा आहे.

टर्म इंश्योरेंस (Term Insurance) काय भूमिका निभावतो तर ती अशी की अशी काही वेळ तुमच्या कुटुंबावर आलीच तर तुम्ही नसताना तुमच्या कुटुंबाला टर्म इंश्योरेंस आर्थिक दृष्ट्या सबळ करतो. याला आम्ही आर्थिक मदत कधीही म्हणणार नाही. कारण ती मदत नसून तुम्हीच तुमच्या कुटुंबासाठी हक्काची रक्कम ठेवली आहे असे म्हणता येईल. या रकमेलाच आर्थिक भाषेत Sum Assured असं म्हणतात. मुलाने कुटुंबासाठी केलेली तरतूद. म्हणजे तुम्हाला अशी भीती कधीही नसेल कीआपण आपल्यामागे आपल्या कुटुंबासाठी एवढा पैसा कमवला पाहिजे. आता हा टर्म इन्सुरन्स असतो तरी नेमका किती रुपयांना तर पहा खालीलप्रमाणे वय ३० असताना २० वर्षासाठी प्रीमिअम: (हे प्रीमिअम भरायची वर्षे तुम्ही कमी पण करू शकता जसे कि ५ वर्षात पैसे भरून वयाच्या १०० वर्षापर्यंत कव्हर)

50 लाख का टर्म इंश्योरेंस का प्रीमियम
अ) ५० लाखापर्यंत – वार्षिक ६००० ते ८००० रुपये वयाच्या ६० वर्षे पर्यंत कवरेज, वयाच्या ८५ वर्षं होईपर्यंत कव्हर घेतल्यास वार्षिक प्रीमिअम रु. ९००० ते ११५०० च्या आसपास होतो.
ब)  १ करोड पर्यंत – वार्षिक ९ ते ११ हजार रुपये कव्हर वयाच्या ६० वर्षं होईपरंत, वयाच्या ८५ वर्षे होईपर्यंत कव्हर घेतल्यास वार्षिक प्रीमिअम रु. २१००० च्या आसपास होतो. 1 करोड़ का टर्म इंश्योरेंस
क) २ करोड पर्यंत – वार्षिक १८००० ते २३००० रुपये वयाच्या ६० वर्षे पर्यंत कवरेज, वयाच्या ८५ वर्षं होईपर्यंत कव्हर घेतल्यास वार्षिक प्रीमिअम रु. २७००० ते ३५००० च्या आसपास होतो.

(वरील किमतींसाठी योजना मराठी टीम कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल, याची नोंद घ्यावी.)

(कोणासाठीही टर्म इंश्योरेंस अमलात येईल अशी वेळ कधीच येऊ नये हीच आई भवानी चरणी प्रार्थना)

२) आर्थिक नियोजन दुसरी स्टेप | Arthik Niyojan STEP- II

Health Insurance / हेल्थ इंश्योरेंस

वर नमूद केलेल्या सगळ्याच कॅटेगरी मधील लोकांसाठी हा महत्वाचा आहे. कोरोना सारख्या जागतिक संकटाला संपूर्ण जग सामोरे गेलेले असून २ वर्ष संपूर्ण जग ढवळून निघाले आहे अशा वेळी आपल्याला या हेल्थ इंश्योरेंस ची गरज भासली. ज्यांच्याकडे हेल्थ इन्सुरन्स नव्हता त्यांना मोठं आर्थिक फटका बसला किंवा सरकारी हॉस्पिटल मध्ये उपचार घ्यावे लागले. करोना काळात नोकरी टिकवण्याच्या मारामारीत हा फटका अजून तीव्र होता. वेळ कधीही सांगून येत नसते. कुटुंबातील कोण कधी लघु-दीर्घ आजारी पडेल सांगता येत नसते. एकदा आजारी पडल्यावर हा इंश्योरेंस परडवेल अश्या किमतीत मिळत नाही. म्हणून तो आधीच घेऊन ठेवणे उत्तम. तो कॅशलेसच असावा. म्हणजे तुम्हाला कोणाच्या आजारपणात एकही रुपया खर्च करण्याची गरज पडणार नाही. या हेल्थ इन्सुरन्स चे वर्षाला किती रुपये हफ्ता असतो ते तुम्ही इंटरनेट वर तपासून पाहू शकता. त्याची Sum Assured तुम्ही ५ लाख पासून १ करोड पर्यंत तुमच्या कमाईच्या प्रमाणात घेऊ शकता. काही शंका असल्यास लेखाच्या शेवटी तुम्ही कॉमेंट करून विचारू शकता. हेल्थ इन्शुरन्स प्लान

आयुष्यात येणाऱ्या सर्वात मोठ्या Emergency आपण वरच्या इंश्योरेंस मार्गाने ९९ टक्के आधीच solve करून ठेवल्या आहेत. म्हणून वरील दोन स्टेप्स मध्ये आपण चिंतामुक्त होतो आणि पुढे पैसा कमवणे व विविध ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी निवांतपणे विचार करू शकतो.

 

 हे ही वाचा – घरबसल्या ऑनलाईन सायबर क्राईम सेलला तक्रार कशी करायची?

३) आर्थिक नियोजन तिसरी स्टेप | Arthik Niyojan STEP -3

म्युच्युअल फंड गुंतवणूक / Mutual Fund (म्युच्युअल फंड गुंतवणूक कशी करावी) / म्युच्युअल फंड म्हणजे काय / म्युच्युअल फंड फायदे मराठी (is sip safe)

म्युच्युअल फंड शब्द ऐकून अजिबात घाबरून जाऊ नका. तुम्ही महिन्याला ५००० हजार रुपये जरी कमवत असाल तरी तुम्ही त्यामध्ये गुंतवूनुक करू शकता. आपण खूप आधीपासून किंवा लहानपणापासून ऐकलेलं असता की शेयर मार्केट मध्ये लोकं बुडली आहेत आणि त्यामुळे असलं काही खरं नसतं. तर थांबा तुम्ही चुकीच ऐकलं आहे. बरोबर असं आहे की हव्यासापोटी नको तितकी गुंतवणूक ज्ञान नसताना अतिजास्त रिस्क घेऊन केली म्हणून लोकं बुडली. आता तुम्ही म्हणाल की ज्ञान तर आम्हाला पण नाही मग आम्ही का करू गुंतवणूक? तर मग म्यूअचल फंड तुमच्या सारख्याच लोकांसाठी आहे. म्युच्युअल फंड मध्ये काय होत कि ज्यांना शेअर मार्केटच खूप ज्ञान आहे म्हणजे अगदी असं की जे लोक शेयर मार्केट कोळून प्यायलेले असतात असे तज्ञ अनेक म्युच्युअल फंड manage करतात. आणि तुमचे पैसे ते मार्केट मध्ये वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवून नफा तुम्हाला मिळवून देतात, या साठी ते तुमच्या कडून खूप कमी चार्ज आकारतात. जसे कि तुम्हाला मिळालेल्या नफ्याच्या ०.५ ते १ टक्का फक्त.

म्युच्युअल फंड गुंतवणूक महत्वाची का आहे?
तुम्ही साध्या FD मध्ये पैसे ठेवून वाढणाऱ्या महागाईला हरवू शकत नाही. म्हणजे आज एक वडापाव १० रुपये ला मिळतो आणि तुम्ही १० रुपये FD  मध्ये अडकवले असतील तर १० वर्षांनी तुम्हाला २० रुपये मिळतील पण १० वर्षांनी वडापावची किंमत २५ रुपये झाली असेल तर मग? म्हणजे तुमचे पैसे वाढले पण ते महागाईच्या दृष्टीने विचार करता कमीच झाले. जर ते १०० रुपये झाले असते तर ते वाढले असे म्हणता आलं असत. तेच पैसे तुम्ही महिन्याला १ रुपये प्रमाणे SIP मध्ये गुंतवले असते तर ते १० वर्षात सरासरी मार्केट अंदाज १२ टक्के जरी पडकला तरी २३२ रुपये झाले असते. मग आता तुम्हीच ठरवा काय उत्तम आहे ते.

मोठं गणित घेतला तर जर तुम्ही १ लाख रुपये FD  मध्ये ठेवले तर ६.५ टक्के दराने १० वर्षात एक लाख नव्वद हजार पाचशे छपन्न रुपये (1,90,556 रुपये) एवढे होतात. तेच एक लाख रुपये म्युच्युअल फंड मध्ये १० वर्षासाठी ठेवले तर सरासरी १२ टक्के व्याज जरी पकडले (याच्यापेक्षा जास्तच दर मिळतो पण आपण कमीत कमी दर १२ टक्केच पकडू) तर तीन लाख दहा हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये (3,10,585 रुपये) रुपये होतात. खालील चित्रामध्ये दोन्ही आकडेमोड calculation दिलं आहे.

sip investment in hindi

sip investment in hindi

 

तर अशाप्रकारे कमीत कमी वरील तीन गोष्टी लक्षात घेऊन प्रत्येकाने आजच्या धकाधकीच्या जीवनात आपले जीवन सुरक्षित आणि सुखी केले पाहिजे. एवढे Basic प्रथम करून आपण आपल्याला हवे तसे आर्थिक नियोजन करू शकता. घर बांधणे किंवा Flat विकत घेणे, नवीन गाडी घेणे या सर्व गोष्टीवर आपण पुढील लेख पार्ट-२ मध्ये चर्चा करणारच आहोत, पण त्याआधी वरील तीन गोष्टी करणे गरजेचंच आहे, एवढ हवं म्हणजे हवंच !!! बाकी advance नियोजन आपण याच लेखाच्या दुसरया पार्ट मध्ये पाहणार आहोत.

आपण म्युच्युअल फंड गुंतवणूक कशी करावी, sip मध्ये गुंतवणूक कशी करावी, उत्तम Term Insurance आणि Health Insurance कसा निवडायचा याबद्दल आपल्याला सोप्या भाषेत आम्ही लिहावं असं वाटत असेल तर आम्हाला खाली कमेंट करून कळवा.

अशाच एकदम सोप्या भाषेत लिहिलेल्या आमच्या नवीन पोस्ट्स विषयी आपल्याला माहित होण्यासाठी आमचा WhatsApp किंवा Telegram ग्रुप जॉईन करा.

योजना मराठी WhatsApp ग्रुप जॉईन करा   किंवा     योजना मराठी Telegram ग्रुप जॉईन करा

 

 

 

 

 

4 thoughts on “आपण कोणीही असा गरीब, श्रीमंत किंवा मध्यमवर्गीय कमीत कमी एवढे आर्थिक नियोजन (Arthik Niyojan ) करायलाच हवे !!!”

Leave a Comment

सायबर भामट्यांपासून सावधान राहा. Cyber Crime Complaint in 2 Minutes यामी गौतमचा Article 370 हा काश्मीर वरील सिनेमा पहाच महाराष्ट्र शासनात फोरेन्सिक तज्ञ म्हणून काम करण्याची संधी तुमचा हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल असा शोधा आपण कोणीही असा, किमान एवढे आर्थिक नियोजन कराच